अखेर नोएडाचे ट्विन टॉवर कोसळले. याला अवघ्या काही सेकंदांचा अवधी लागला आणि नोएडाच्या सेक्टर ९३अ मध्ये असलेले सुपरटेकचे ट्विन टॉवर्स जमिनीत गाडले गेले. टॉवर कोसळताच आजूबाजूला फक्त धुराचे लोट दिसत होते. नोएडा द्रुतगती मार्गावर तर धुळीची जाड चादर तयार झाली होती. टॉवर पाडण्याआधी सायरन वाजवून लोकांना सतर्क करण्यात आले होते. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने या भागातील वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. हे ट्विन टॉवर्स क्षणार्धात कसे कोसळले याच्याशी संबंधित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

या इमारती पाडण्यासाठी सुमारे ३७०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. ट्विन टॉवर्सच्या पडल्याने निघणारी धूळ अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होणार आहे. तज्ञांच्या मते, दिल्ली-एनसीआर हे आधीच प्रदूषित शहर आहे, अशा परिस्थितीत या ट्विन टॉवरमधून निघणाऱ्या धुळीमुळे लोकांना खोकला, श्वास लागणे असा त्रास होऊ शकतो. ट्विन टॉवर खाली पडताच ट्विटरवर याच्याशी संबंधित मीम्स खूप व्हायरल होत आहेत. लोक वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार मीम्स शेअर करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांचा नितीन गडकरींना थेट सवाल; मी बोगद्यातून जाणं पसंत करेन पण…)

एक नजर टाकूया काही निवडक ट्वीट्सवर…

( हे ही वाचा: VIRAL VIDEO : चक्क दोन मधमाशांनी उघडले फँटाच्या बाटलीचे झाकण; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल)

( हे ही वाचा: VIDEO: दहीहंडी फोडायला चढलेल्या ‘गोविंदा’चा सातव्या थरावरून पडून मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली धक्कादायक घटना)

महाकाय ट्विन टॉवर कोसळताच सगळीकडे धुराचा लोट दिसत होता. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या इमारती देखील दिसेनाश्या झाल्या होत्या. याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या दिसत आहेत. तसंच यावरचे मजेशीर मिम्सद्वारे लोकं आपली प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत.

Story img Loader