देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. विशेषत: उत्तर भारतात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावासामुळं काही भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं असून, रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे दिल्लीच्या सकल भागामध्ये पाणी साचल्याचे बघायला मिळतंय. दिल्लीच्या पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल. त्यात आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हिंडन नदीच्या पुरामुळे दिल्लीत भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे.
हिंडनमध्ये आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्हेरा येथील नऊ वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे. नदीकाठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांना घरे खाली करून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकट्या करहेरा येथील सुमारे १२ हजाार कुटुंबांना प्रशासनाने तयार केलेल्या निवाऱ्यात किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे आवाहन केले जात आहे. हा व्हिडीओ एका पार्किंग लॉटमधली आहे. जेथे तुम्ही पाहू शकता की जवळ-जवळ संपूर्ण कारच पाण्याखाली बुडाली आहे. कारचा थोडा वरचा भागच आपल्याला पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: बापरे! धावत्या लोकलमधून तरुणाचा मोबाईल हिसकावला; पाहा चोर कशी करतात चोरी
हा व्हिडीओ एएनआयने आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळं काही भागातील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्यावर बोट चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ फरीदाबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे.