Noida Woman Abusing Guard Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि पुरूषांच्या भांडणाचे वेगवेगळे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. काही दिवसांपूर्वी नोएडामध्ये एका महिलेने रिक्षा चालकाला चोप दिल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आता पुन्हा एका सिक्यूरिटी गार्डला मार खावा लागला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. फक्त गेट उघडायला उशीर झाला म्हणून महिलेने या सिक्यूरिटी गार्डला बेदम मारहाण आणि शिवीगाळ केलीय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाईल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका महिला सोसायटीच्या सिक्यूरिटी गार्डला मारहाण करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये ती महिला गार्डला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहे. त्याचबरोबर ही महिला बिहारच्या सुरक्षा रक्षकांनाही अपमानास्पद भाषेत उच्चारताना दिसत आहेत. केवळ सोसायटीचं गेट उशिरा उघडल्यानं ही महिला चिडली आणि आपला संताप गार्डवर काढताना दिसतेय. गार्डसोबत गैरवर्तन सुद्धा करताना दिसत आहे. व्हिडीओ दोन मिनिटांपेक्षा जास्त आहे.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
fire godown Pimpri-Chinchwad, Massive fire at godown,
पिंपरी-चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुरांचे लोट काही किलोमीटर..
husband sets car on fire wife dies
पत्नीला तिच्या मित्राबरोबर कारमध्ये पाहिलं, पतीने पाठलाग केला अन् पेट्रोल टाकून कार पेटवली, महिलेचा होरपळून मृत्यू
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा : VIRAL : दहीहंडी फोडण्यासाठी मद्यधुंद व्यक्ती ८० फूट उंचावर चढला आणि ५५ हजार रूपयांचं बक्षिस मागू लागला

या व्हिडीओमध्ये महिलेने गार्डचा हात धरला असून गार्ड महिलेसमोर विनवणी देखील करताना दिसतोय. मात्र, मद्यधुंद अवस्थेत महिलेचा पारा इतका चढला की तिला त्याच्यावर साधी दया सुद्धा आली नाही. काही वेळाने अपशब्द वापरताना आणि गार्डची कॉलर वारंवार पकडताना ही महिला दिसून येते. महिलेच्या गैरवर्तणुकीनंतर सुरक्षारक्षक संतापला असून नोकरी सोडण्याबाबत बोलत आहे.

आणखी वाचा : माणुसकी अजूनही जिवंत आहे! हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नोएडामधला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नोएडा पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलेचा व्हिडीओ जेपी ग्रीन विश सोसायटीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी नोएडाचे एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, ती सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन करत आहे. हा गुन्हा सुरक्षा रक्षकांनी नोंदवला आहे. नोएडा सेक्टर १२६ पोलीस स्टेशनने महिलेच्या या व्हिडीओची दखल घेतली असून पोलीस कारवाई करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बॅटरी काढायला गेला अन् हातातच अगदी बॉम्बसारखा फुटला मोबाईल, घटना कॅमेऱ्यात कैद

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : सांगा प्राणी कोण? बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून खेचत होता, लोक VIDEO बनवत राहिले…

खरं तर, नोएडामधून अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ज्यात काही सुरक्षारक्षक आणि सोसायटीतील लोकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आता नोएडाच्या ग्रँड ओमॅक्स सोसायटीचे प्रकरण आता चर्चेत आले आहे.

Story img Loader