नोकीया ही कंपनी मोबाइल कंपनी म्हणून ओळखल्या जाते. आपल्या विविध डिझाइनच्या फोन्समुळे एकेकाळी ही कंपनी नागरिकांना भूरळ घालत होती. मात्र ही कंपनी फोन विकण्यापूर्वी टॉयलेट पेपर विकत होती, असे म्हटल्यास तुम्हाला विश्वास बसेल का? हे पचवायला अवघड जाईल, मात्र हे सत्य आहे. नोकिया कंपनी ही टॉयलेट पेपर बनवत होती. तिच्या प्रमाणे इतर काही कंपन्या आहेत ज्या पूर्वी वेगळं काही बनवायच्या आणि आज ते वेगळं काही तरी बनवून प्रसिद्ध झाल्या आहेत.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी अशा काही कंपन्यांची नावे आपल्या ट्विटर हँडलवरून जाहीर केली आहेत ज्यांनी व्यवसायाची सुरुवात वेगळीच उत्पादने निर्मण करू केली होती आणि आज ते वेगळीच उत्पादने तयार करीत आहेत.

(Viral video : ‘या’ विशेष विमानाने भारतात आले चित्ते, लूकमुळे आधीच चर्चेत, पाहा विमानाचे आतील दृश्य)

१) नोकिया बनवत होती टॉयलेट पेपर

मोबाईल क्षेत्रात नोकिया या कंपनीने मोठी गगन भरारी घेतली होती. आपल्या विविध डिजाइन्सचे फोन आणि त्यातील फीचरमुळे नोकिया ही ग्राहकांची एकमेव पसंत ठरली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, नोकिया ही सुरुवातील उदयास आली तेव्हा ती मोबाइल विकत नव्हती. नोकियाची सुरुवात पेपर मिल कंपनीने झाली होती. कंपनी सुरुवातीला टॉयलेट पेपर बनवत होती. कंपनीने केबल, पेपर प्रोडक्टस, रबर बूट, टायर, टीव्ही आणि मोबाइल फोन बनवून आपले नाव जगभरात उज्ज्वल केले.

२) सोनीने बनवले होते राइस कुकर

उत्तम पिक्चर क्वालिटीसाठी सोनीच्या टीव्ही ओळखल्या जातात. कंपनीची देखील ओळख टीव्ही आणि कंज्युमर प्रोडक्टसमुळे आहे. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की सोनीचे पहिले उत्पादन हे इलेक्ट्रिक राइस कुकर होते. मात्र, हे उत्पादन काही खास चालले नाही. त्यानंतर कंपनीने टेप रेकॉर्डर बनवण्यास सुरुवात केली.

(Viral Video : केरळ येथील व्यक्तीने मुलांच्या सुरक्षेसाठी उचलली बंदूक, कारण जाणून हैराण व्हाल)

३) टोयोटा हातमाग यंत्र बनवायची

आज एक्सयूव्ही क्षेत्रात टोयोटाने मोठे नाव कमवले आहे. जगभरात टोयोटा या वाहन कंपनीच्या फॉर्च्युनर आणि इनोव्हा या गाड्यांना जोरदार मागणी आहे. मात्र, कंपनीचा सुरुवातीला वाहन निर्मितीचा व्यवसाय नव्हता. टोयोटा इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनची सुरुवात १९२६ साली झाली होती आणि कंपनी सर्वात आधी स्वयंचलित हातमाग यंत्र बनवत होती.

जपान सरकारने टोयोटा ऑटोमॅटिक लूम वर्कला ऑटोमोबाइल प्रोडक्शनसाठी प्रोत्साहित केले होते. चीनसोबत युद्धामुळे जपानला देशांतर्गत वाहनांच्या उत्पादनाची गरज होती. यानंतर टोयोटाने १९३३ साली ऑटोमोटिव्ह प्रोडक्शन डिव्हीजनची स्थापना केली आणि वाहनांच्या निर्मितीची सुरुवात केली.

(Viral : हिंसक श्वानांपासून थोडक्यात बचावले विद्यार्थी, पाहा व्हिडिओ..)

४) कोलगेट मोणबत्ती बनवायची

टुटपेस्ट क्षेत्रात अग्रगण्य माणल्या जाणारी कोलगेट ही कंपनी सुरुवातीला साबन आणि मेणबत्ती बनवायची. कोलगेट अमेरिकेतील कंपनी असून ती सध्या टुथपेस्ट, टुथब्रश, माउथवॉश बनवते. कंपनीने माउथ क्लिनिंग उत्पादनांच्या विक्रीची सुरुवात वर्ष १८७३ पासून केली. त्यावेळी टूथपेस्ट काचेच्या भरणीत विकली जात होती. १८९६ पासून पेस्ट ट्यूबमध्ये विकण्यास सुरुवात झाली.

५) आयकेइए विकायची पेन

आयकेइए ही एक स्विडिश कंपनी असून ती फर्निचर आणि किचनमधील सामान बनवते. कंपनीची सुरुवात १९४३ साली झाली होती. कंपनी सुरुवातील पेन आणि लाइटर विकत होती.

(Viral : कोरीयन तरुणांना ‘काला चष्माची’ भुरळ, गाण्यावर केला भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ)

वरील कंपन्या आज जी उत्पादने विकत आहे, ज्यातून त्यांना सध्या जगभरात ओळखले जाते त्यांची सुरुवात मात्र वेगळ्याच उत्पादनांच्या निर्मितीने झाली आहे, हे आपण वाचले. ही माहिती नक्कीच अवाक करणारी आहे. नोकिया, टोयोटा या सारख्या गाजलेल्या कंपन्यांनी वेगळीच वाट धरली आणि त्यांनी काही अनोखे करून आज जगभरातील लोकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे.

Story img Loader