उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याच्या क्रूरतेच्या कथा आपण वारंवार ऐकतो, वाचतो. संयुक्त राष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांना न जुमानता त्याने अणवस्त्र चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. त्याच्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दरीत ढकलला जाईल अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्याच्या क्रौर्याच्या कथा ऐकून आपल्याच मनात या हुकूमशहाबद्दल एवढी दहशत निर्माण झालीय आता तुम्ही कल्पना करा की या देशातील लोक कशा प्रकारे राहत असतील. इथल्या नागरिकांना कोणतंही स्वातंत्र्य अनुभवता येत नाही, अगदी आपण कशा प्रकारे हेअरकट करावा हेदेखील ठरवण्याचा अधिकार इथल्या नागरिकांना नाही.

वाचा : गर्लफ्रेंडसोबत घडलेला ‘तो’ प्रसंग खरंतर उत्तर कोरियातील हुकूमशहाच्या क्रौर्याचा पहिला टप्पा होता

फिनलंडमधल्या एका पत्रकाराने काही महिन्यांपूर्वी एक ट्विट केलं होतं. इथल्या कायद्यानुसार नागरिकांना स्वत:चा हेअरकट ठरवण्याचा अधिकार नाही. येथे महिला आणि पुरुषांना काही हेअरकटचे प्रकार ठरवून दिले आहेत. त्याच पद्धतीने केस कापण्याची सक्ती त्यांना करण्यात येत असल्याचे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. पुरुषांना आणि महिलांना प्रत्येकी पंधरा हेअरकटचा पर्याय उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त दुसरा हेअरकट करण्याचा विचार ते स्वप्नातही करू शकत नाही.

काही वर्षांपूर्वी किम जाँग उनने आपल्यासारखी हेअर स्टाईल ठेवण्याचा हुकूम जनतेला दिला होता. जो पुरुष किमसारखी हेअरस्टाईल ठेवणार नाही त्याचा चेहरा विद्रुप करण्यात येईल अशी सक्ती त्याने केल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी दिल्या. इतकंच नाही तर महिलांवर त्याच्या पत्नीसारखी हेअरस्टाईल करण्याची सक्ती करण्यात आली होती.

Story img Loader