आपल्या एकापेक्षा एक विचित्र आणि भयावह वागणूकीसाठी कुप्रसिद्ध असलेला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उनने पोलिस विभागासाठी नवा फतवा काढला आहे. आता यापुढे वाहतूक पोलीस विभागात फक्त सुंदर आणि उंच मुलींनाच प्राधान्य दिले जाईल असे त्याने सांगितले आहे. विशेष म्हणजे या मुलींची निवड किम स्वत: मुलाखत घेऊन करणार आहे.
वाचा : ‘फी नको पण झाडे लावा’, शाळेचा अनोखा उपक्रम
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने वाहतूक विभागासाठी नवे धोरण ठरवले आहे. यापुढे वाहतूक विभागात फक्त सुंदर आणि उंच मुलींनाच प्राधान्य देण्यात येईल असे त्याने सांगितले. त्यामुळे उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या पियांगयांगच्या रस्त्यावर या सुंदर पोलीस कर्मचारी दिसू लागल्या आहेत. १६ ते २६ वयोगटातील अविवाहित मुलींनाच येथे प्राधान्य देण्यात आले आहे. या तरुणींची निवड किम जोंगने स्वत: केली असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे या सुंदर तरुणींना वर्षांच्या १२ महिने वेगवेगळा गणवेश देण्यात आला आहे. या तरुणी उच्च शिक्षित असणेही तितकेच आवश्यक आहे. या तरूणींना घसघसीत पगारही देऊ केला आहे.
VIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग
आतापर्यंत राजधानीत ३०० सुंदर महिला पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती झाली असल्याचे समजते आहे. तीन वर्षांपूर्वी किमवर हल्ला झाला होता. तेव्हा एका महिला पोलीस कर्मचा-याने त्याला वाचवले होते तेव्हापासूनच किमने वाहतूक पोलीस विभागात सुंदर तरुणींना प्राधान्य देण्याचे ठरवले.