उत्तर कोरियाच्या लष्करातील एक जवान इतर जवानांना चकवा देत दक्षिण कोरियात पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. या पलायन नाट्याचा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जवानाचं नाव काय हे समजू शकलं नाही पण पाच गोळ्या लागूनही तो इतर जवानांच्या तावडीतून सुखरूप बचावला आहे. सीमा ओलांडल्यानंतर त्याला दक्षिण कोरियाच्या जवानांनी तब्यात घेतले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

Viral Video : ट्रेनमध्ये शिरलेल्या सापाला हातानेच मारलं

Viral Video : ‘त्या’ साऱ्या जणींनी मिळून पाकिस्तानी फलंदाजांना झुकवले

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश एकमेकांचे शत्रू आहे. या दोन्ही देशांच्यामध्ये सीमा आहे जी जगातील सर्वात धोकादायक सीमा मानली जाते. ती ओलांडून क्रूर हुकमशहा किम जाँग उनच्या देशातून सुटून जाण्यास त्याला यश आलं आहे. हा जवान गाडी वेगानं चालवत दोन्ही देशांच्या सीमेपर्यंत पोहोचला. उत्तर कोरिया लष्करातील जवानांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जवानांनी गोळ्याही झाडल्या, पण गोळीबारातून तो निसटण्यात यशस्वी झाला. या जवानाच्या दिशेने ४० गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातल्या पाच त्याला लागल्या पण जखमी असूनही त्याने हार मानली नाही, आणि उत्तर कोरियातून निसटण्यात तो यशस्वी झाला.

गर्लफ्रेंडसोबत घडलेला ‘तो’ प्रसंग खरंतर उत्तर कोरियातील हुकूमशहाच्या क्रौर्याचा पहिला टप्पा होता

Story img Loader