भारतातील पारंपरिक पोशाखाची क्रेझ जगभरात पाहायला मिळते. विशेषत: जेव्हा साडीचा विषय येतो तेव्हा कोणीही तिच्याशी स्पर्धा करू शकत नाही. कारण- साडी अनेक स्त्रियांचा आवडता पेहराव आहे. सेलेब्स आणि सामान्य महिलांमध्ये साडीची वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या, रंगांच्या विविध साड्या बाजारात पाहायला मिळतात; पण भारतीय महिलाच नाही, तर आता नॉर्वेच्या राजदूतांनाही साडीने भुरळ पाडली आहे. नॉर्वेच्या भारतातील राजदूत मे एलिन स्टेनर खास दिवाळीनिमित्त साडी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या साड्यांमधील विविधता पाहून खूप भारावल्या. त्यांनाही समजेना की, कोणत्या रंगाची साडी खरेदी करू. अशा वेळी त्यांनी नेटिझन्सचा सल्ला घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणती साडी खरेदी करू? नॉर्वेच्या राजदूत संभ्रमात

नॉर्वेच्या भारतातील राजदूत मे एलिन स्टेनर दिवाळीनिमित्त साडी खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेल्या. मात्र, तिथे साडी निवडताना मोठ्या पेचप्रसंगांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या रंगांच्या साड्या ट्राय करून पाहिल्या. पण, कोणती साडी खरेदी करू हे त्यांना समजत नव्हते. अशा वेळी आयुष्यातील पहिली साडी निवडण्यासाठी त्यांनी नेटिझन्सची मदत घेतली. इतकेच नाही, तर त्यांनी त्यांच्या पतीसाठीही एक कुर्ता सेट खरेदी केला. याविषयी स्टेनर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये स्टेनर यांनी लिहिलेय की, आठ आठवड्यांपासून भारतात आहे. दिवाळीसाठी पहिली साडी खरेदी करीत आहे. या सर्व साड्यांचा कपडा, रंग व विणकाम पाहून, त्यातील एक निवडणे माझ्यासाठी कठीण होते; किती अप्रतिम कारागिरी!.

नेटिझन्सकडून मागितले उत्तर

स्टेनर यांनी त्याच पोस्टमध्ये नेटिझन्सना कोणत्या रंगाची साडी खरेदी करू याबाबतचे मत विचारत लिहिले की, मी लाल रंगाची साडी निवडेन. तुम्हाला काय वाटते? यात त्यांनी पतीही भारतीय पेहराव करणार असल्याचे म्हणत त्यांचा कुर्ता सेट निवडणे सोपे होते, असे म्हटले.

पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये स्टेनर तीन वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांमध्ये दिसत आहे. एका फोटोत त्यांच्या पतीने पारंपरिक कुर्ता सेट परिधान केल्याचे दिसतेय. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, त्यावर लोक आपापली मते मांडत आहेत. बहुतेक लोकांनी तिला लाल साडी निवडण्याचा सल्ला दिला आहे. त्यात एका युजरने लिहिलेय की, आम्हा भारतीयांकडे साडी आणि कुर्ता परिधान करण्यासाठी अनेक पुरेसे सण आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, राजदूत मॅडम, तुम्ही सर्व रंगांच्या साड्यांमध्ये छान दिसत आहात; पण तुम्हाला साडी कशी नेसतात हे कसे माहीत? तिसरा युजर म्हणाला की, तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Norway ambassador elin steiner tough time choosing saree for diwali internet jumps in to help elin steiner desi look viral sjr