“बालपण देगा देवा” असे म्हणतात ते उगाच नाही. बालपणीचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आठवणीचा काळ असतो. बालपणी कशाचीही चिंता नाही, फक्त मनसोक्त खेळायचे, बागडायचे आणि मज्जा करायची. लहानपणी कितीतरी मजेशीर खेळ आपण सर्वच जण खेळलो आहोत. भातुकली, लपाछपी, पकडा-पकडी, विष-अमृत, डोंगर-पाणी, टिपरी किंवा फरशी-पाणी, विट्टी-दांडू, बॅट-बॉल, इथली माशी कुठे उडाली, टिपी-टिपी टॉप-टॉप, कानगोष्टी, आईचं किंवा मामाचं पत्र हरवले, चोर-चिठ्ठ्या, साप-शिडी, चल्लस-आठ, काच-कवड्या..असे अनेक खेळ तुम्ही खेळला असला. सध्या असाच लहानपणीच्या एका खेळाची आठवण करून देणारा एका व्हिडिओ चर्चेत आला आहे.

लहानपणी गावी गेल्यावर बहिण-भावडांबरोबर किंवा शाळेमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर हा तुम्ही हा खेळ नक्की खेळला असाल. या खेळाला काही लोक ‘आईचं पत्र हरवले’ म्हणतात तर काही लोक ‘मामाचं पत्र हरवले’. खेळ अगदी सोपा आहे. खेळात सहभागी सर्व खेळाडू मैदानावर वर्तुळाकार बसतात, ज्यांच्यावर राज्य आहे तो व्यक्ती रुमाल घेतो आणि सर्वांभोवती गोल गोल फिरतो. राज्य घेणारी व्यक्ती सर्वांभोवती फिरताना जोर जोरात विचारते, की “माझ्या आईचं किंवा मामाचं पत्र हरवलं….” त्यावर उत्तर देताना खाली बसलेले सर्वजण म्हणतात, “ते मला सापडलं.: असे करताना राज्य घेणारा व्यक्ती हळूच एका खेळाडूच्या मागे रुमाल टाकून देतो. ज्या खेळाडूच्या मागे रुमाल टाकला आहे त्याने जर रुमाल पडल्याचे पाहिले तर रुमाल उचलतो आणि राज्य असलेल्या व्यक्तीला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावतो आणि ज्या व्यक्तीवर राज्य आहे तो व्यक्ती पूर्ण वर्तूळ फिरून ज्याच्या मागे रुमाल टाकला आहे त्याच्या जागी जाऊन बसण्याचा प्रयत्न करतो. जर त्याला जागा मिळाली तर राज्य ज्याच्या जागेवर बसला त्याच्यावर जाते आणि जागा पकडण्याआधी राज्य घेणारी व्यक्ती पकडली गेली तर पुन्हा राज्य त्याच्यावरच येते. हा खेळ ऐकायला जितका मजेशीर वाटत आहे तितकाच खेळायला देखील मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या बालपणीच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. आजकालची मुलं जी सतत व्हिडिओ गेम किंवा मोबाईल घेऊन बसलेली असतात त्यांना या जुने खेळ शिकवा तरच त्यांना त्यातील मज्जा कळेल.

a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Tourists Pull The Lions Hair And Then Watch What The King Of The Jungle Does Animal Video Goes Viral
पर्यटकांनी चक्क सिंहाच्या केसांना हात लावला; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
farmers be careful while working in farms during rainy season a snake was hiding under the electric box see the thrilling Shocking video
शेतकरी मित्रांनो शेतात मोटार चालू करायला जाताय? थांबा, या शेतकऱ्याबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल
Farmer success story farmer old lady built bungalow worth 1 crore by selling vegetables video goes viral
“कोल्हापूरच्या आजीचा नाद नाय” भाजी विकून बांधला १ कोटीचा बंगला; VIDEO पाहून अवाक् व्हाल

हेही वाचा – “आयुष्यात हे दिवस परत आले पाहिजे”, मैदानावर कवायत करणारे विद्यार्थी पाहून तुम्हालाही आठवेल तुमची शाळा, पाहा सुंदर Video

हेही वाचा – चिमुकल्याच्या जीवाशी खेळ कशाला? रेल्वेस्थानकावर सरकता जीना चढताना महिलांनी धोक्यात टाकला लेकराचा जीव, Video Viral

हा व्हि़डीओ kokan_chi_savari नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लहानपणी हा खेळ कोणी खेळला आहे.”
व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यांशी अकुशांचा मारा”

एकाने लिहिले की, “मामाच पत्र हरवलं त्याचबरोबर हा खेळ खेळणारी पिढी पण हरवली.”

दुसऱ्याने लिहिले की,” मोबाईल फोन काय आला आणि सगळं बालपणातील खेळ घेऊन गेला”