Auto Rickshaw Poster Viral : पुणेरी पाट्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील ज्यावर अनेकदा एखाद्या गोष्टीवर उपाहासात्मक टिका केली जाते. पुणेरी पाट्यांची शैलीच तशी निराळी आहे. कधी किमान शब्दात कमाल अपमान तर कधी शालूमध्ये जोडे. पण अनेकदा पुणेरी पाटीद्वारे एखादी समस्या किंवा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा उपाहासात्मक टिका करून मांडली जाते. अशा एका पोस्टरची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगली आहे.
रिक्षावरील पोस्टर चर्चेत
व्हायरल व्हिडीओमध्ये एका रिक्षावर पाटी लावली आहे. पाटीवर लिहिले आहे की,”पाण्यात विरघळणारा पदार्थ कोणता आणि त्याखाली पर्याय दिले आहे की अ) मीठ आणि ब) साखर” प्रश्न वाचून तुम्ही म्हणाल की उत्तर द्याल की दोन्ही पदार्थ पाण्यात विरघळतात पण उत्तर मात्र वेगळेच आहे. पोस्टरवर लिहिलेले उत्तर वाचून तुम्हाला हसू येईल हे मात्र नक्की. पोस्टरनुसार, “पाण्यात विरघळणारा पदार्थ महापालिकेचे डांबर आहे.”
येथे पाहा Viral Video
हेही वाचा – पुणेरी आजींचा नादखुळा! “तुम तो धोखेबाज” गाण्यावर ट्रॅक्टरवर चढून नाचल्या आजीबाई, Video तुफान Viral
महापालिकेची उपाहास्मक टिका
एव्हाना तुम्हालाही मुद्दा लक्षात आला असेलच. महापालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी डांबरी रस्ते तयार केले जातात पण पावसाळा संपण्यापूर्वीच रस्त्यांची चाळण होऊन जाते ज्यामुळे नेटकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या या ढिसाळ कारभारावर एक उपाहास्मक टिका या पोस्टर द्वारे केला आहे.
हेही वाचा –बापरे! बाप्पाच्या मूर्तीमध्ये शिरून उंदराने पोखरला बाप्पाचा हात VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्
नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर sudarshanm12वर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,”पुण्यातील डांबर” व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, “अगदी बरोबर बोलला” दुसरा म्हणाला, “महानगरपालिकेचे रस्ते”