7 Seater Bike Viral Video: सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असत. हा प्लॅटफॉर्म निःसंशयपणे वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहेत. यावर एक व्हिडीओ (viral video) शूट करून किंवा फोटो टाकून लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचवता येते. परंतु अनेक वेळा असे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातात ज्यामुळे गैरप्रकार, घटना समोर येतात. भारतीयांना जुगाडू असेही म्हणतात, म्हणजेच जिथे सुईला जागा नसते, तिथे ते नेहमीच हत्ती बसवण्यात पटाईत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये ३-४ नव्हे तर ७ जण दुचाकीवर बसून जात आहेत.

एका बाईकवर ७ लोक बसलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता, तर पुन्हा एकदा वाहतूक नियमांची पायमल्ली करणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त २ महिला आणि ४ लहान मुले आहेत.

(हे ही वाचा: वाघिण कुटुंबासह जंगलात निघाली फिरायला; जंगल सफारीदरम्यानचा Video Viral)

(हे ही वाचा: म्हशीचं रेडकू जेव्हा हत्तीला नडतं; मजेशीर viral video ला नेटीझन्सची पसंती)

हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. हे देसी जुगाडचे एक उत्तम उदाहरण आहे, तर या व्हिडीओची दुसरी बाजू देखील कटू सत्य सांगते आहे. देशात रस्ते अपघातांची वाढती घटना पाहता दुचाकीवर एकाच वेळी दोन जणांना बसवण्याचा नियम आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांबाबतही सरकार पूर्वीपेक्षा कडक झाले आहे. तरीही असे वागणे ही लोकांच्या निष्काळजीपणाची बाब ठरते.

Story img Loader