वाहतूक पोलिस अनेकदा आपणाला वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. वाहतुकीच्या नियमाचे पालन नाही केलं तर ते आपल्या जीवावर कसं बेतू शकतं यासाठी ते सतत जनजागृती करत असतात. शिवाय हा मेसेज देण्यासाठी ते कधी विनोदी मिम्सचा तर कधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भयंकर अपघातांच्या व्हिडीओचा आधार घेतात, पोलिसांचा यामागचा उद्देश हाच असतो की, नागरिकांनामध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो दिल्ली वाहतूक विभागाने शेअर केला आहे.
रस्ते अपघात रोखण्यासाठी दिल्ली वाहतूक पोलिस वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवत असतात. लोकांना जागरूक करण्यासाठी ते सोशल मीडियावर अधूनमधून व्हिडिओ शेअर करत असतात. सोमवारी असाच एक व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सीट बेल्ट लावलं नाही तर मोठ्या अपघाताला कसं सामोरं जावं लागत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय हा व्हिडीओ नेटकऱ्यांनाही भावल्याचं दिसत आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या व्हिडिओ शेअर करण्यात आलीा आहे. वाहन चालवताना काळजी घेण्याची आणि वाहतूकीचे नियम पाळण्याची किती गरजेचं आहे ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल.
हेही वाचा- ऐकावं ते नवलच! चोरट्यांनी पळवला २ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक; फोटो होतोय Viral
व्हिडिओमधून काय दिला संदेश ?
३३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक तरुण कार चालवताना दिसत आहे. पण कार चालवत अशताना तो सुरुवातील सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करतो. पण आता सीट बेल्ट लावायची काही गरज नाही, पुढे गेलो की घालू असं म्हणून तो सीट बेल्ट लावत नाही. त्याकडे दुर्लक्ष करतो. दरम्यान, कार काही अंतरावर जाते आणि कारमधील सीट बेल्ट लावाला नाही म्हणून कारमधील अलार्म वाचतो जो सीट बेल्ट लावण्याची आठवण करुन देतो.
हेही पाहा- Video: पापा की परीचा अजून एक कारनामा! बाईकवरून सुसाट जाताना अचानक एकाला दिली धडक अन्…
मात्र, हा अलार्म वाजताच कार चालवणारा तरुण चिडचिड करतो आणि हा अलार्म कारमधून काढायला हवं असं म्हणतो. अशातच तो बोलत पुढं जातो आणि त्याचा अपघात होतो. त्यामुळे गाडी चालवताना काळजी न घेतल्यास वाहतूकीचे नियम न पाळल्यास मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागू शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.