Anand Mahindra Shares Motivational VIdeo : रोजच्या धावपळीच्या जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र शोधता शोधता अनेकांच्या नाकी नऊ येतात. पण नकारात्म विचारांचा ओझं पाठीवर घेऊन आयुष्य जगणाऱ्या माणसांना महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा नेहमीच प्रेरणादायी व्हिडीओंच्या माध्यमातून जागे करत असतात. आताही महिंद्रा यांनी यशस्वी होण्यासाठी काय करावं लागंत? असा संदेश एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे. धावणाऱ्या शर्यतीत एका मुलाने सीमारेषा पार करण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली आणि विजयाची माळ गळ्यात घातली. १२ सेकंदाच्या या व्हिडीओने लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली असून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रा यांनी एका तरुणाचा धावण्याच्या शर्यतीचा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडी शेअर करत त्यांनी सुंदर कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओ शेअर करत महिंद्रा यांनी म्हटलंय, “हा व्हिडीओ खूप आवडला. नेहमीप्रमाणेच हा व्हिडीओही प्रेरणा देणारा आहे. पहिला क्रमांक मिळवण्यासाठी तुमच्याकडे नक्कीच एक संधी असते. एक उंच झेप तुम्हाला यशाचं शिखर गाठून देऊ शकते.” एका तरुणाने धावण्याच्या स्पर्धेत शेवटच्या क्षणी मोठी झेप घेऊन सीमारेष पार केली आणि स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर नाव कोरलं. तरुणाचा हा जबरदस्त व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही इम्प्रेस झाले. प्रतिस्पर्धी धावण्याच्या शर्यतीत पुढे असताना क्षणाचाही विलंब न लावता उडी मारून सीमारेषा पार करणाऱ्या या तरुणाने विजयाचा झेंडा रोवला.

नक्की वाचा – मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आधी जेवणावर ताव मारला, बिल भरायची वेळ आली अन्… त्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ २.५ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ३ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, आयुष्य खूप सुंदर आहे. “अपयशाच्या पायरीजवळ असतानाही आपल्याकडे विजय प्राप्त करण्याची एक संधी असते. प्रत्येक अनुभव हा आयुष्याच्या प्रवासासाठी आणि शिकण्यासाठी महत्वाचा असतो. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. ध्येय गाठण्यासाठी अपार मेहनत घ्या स्वत: त्यासाठी प्रयत्न करा.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, मला खात्री आहे, हा मुलगा जिंकला नाही. कारण फिनिश लाईन जवळ असताना धावण्याच्या स्पर्धेत तुम्ही उडी मारू शकत नाहीत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nothing is impossible in life anand mahindra shares motivational viral video of a runner you will get positive vibes after watching it nss