हिवाळा, असो की उन्हाळा प्रत्येक ऋतूत डासांची समस्या उद्भवते. डास चावल्यास मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू यांसारखे गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे डांसापासून उद्भवणाऱ्या आजारांमुळे कुटुंबाच्या आरोग्याची काळजी अनेकांना वाटते. डासांपासून सुटका करण्यासाठी अनेकदा आपण कॉइल वापरतो, तर कधी रॅकेटचा वापर करतो. परंतु डासांपासून पूर्णपणे सुटका करण्याचा कोणताही खात्रीशीर उपाय नाहीये. पण सध्या एका चिनी इंजिनीअरने बनवलेल्या खास मशिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे डासांपासून कायमची सुटका करता येऊ शकते असा दावा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्ल्ड ऑफ इंजिनीअर नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “एका चिनी इंजिनीअरने डासविरोधी हवाई संरक्षण सिस्टम तयार केली आहे.” ही सिस्टममध्ये एक लाँचर दिसत आहे, ज्यामधून तोफेच्या गोळ्याप्रमाणे एक विशेष प्रकारचा प्रकाश बाहेर पडताना दिसत आहे. तसेच यावेळी एक रडार यंत्रणा सतत फिरताना दिसते, जी हवेत उडणारे डास शोधत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओत इंजिनीअरने एक डायरी ठेवली आहे, ज्यामध्ये तो मेलेले डासांची नोंद करत आहे. शिवाय डास कधी मारला याची तारीख आणि वेळ देखील डायरीमध्ये लिहिल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- चुकीला माफी नाही! शिक्षकाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी एकमेकांना लगावली सणसणीत चापट, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

नेटकरी म्हणतायत, “आम्हाला मशिन पाहिजे…”

इंजिनिअरने बनवलेले हे अनोखे मशिन पाहून नेटकरी त्याचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत १३ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यापैकी अनेकजण आम्हालाही हे मशिन पाहिजे असं म्हणत आहेत. एका युजरने लिहिलं, “चीनमध्ये बनवलेली ही एकमेव गोष्ट आहे जी मला आवडली.” तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी मात्र हे मशिन बनावट असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now get rid of mosquitoes forever amazing mosquito killing machine made by chinese engineer video goes viral jap
Show comments