सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कोणता व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय अनेक कंपन्या आणि लोक असे असतात त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या कृत्यामुळे ते सोशल मीडियावर फेमस किंवा ट्रोल होतात. सध्या अशाच एका पिझ्झा विकणाऱ्या दुकानाचा मालक ट्रोल झाला आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे त्याने आपल्या दुकानाबाहेर लावलेल्या एका जाहीरातीचा फोटो. त्या जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
तर अनेकांनी त्या जाहीरातीचा निषेध केला आहे. आता या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला त्या जाहिरातीचा फोटो पाहिल्यावरच समजेल. सध्याच्या काळात नोकरी मिळणे अवघड झाले आहे. अनेक सुशिक्षित सध्या बेरोजगार असल्याचं पाहायला मिळत आहेत. शिवाय आम्हाला स्मार्ट आणि टॅंलेटेट लोकांची गरज असल्याचं अनेक कंपन्यांकडून सांगितलं जात. इथपर्यंत ठीक होत, मात्र सध्या एका दुकानाबाहेर मोठी जाहीरात लावली आहे ज्यामध्ये, जे मूर्ख नाहीत अशाच लोकांना नोकरी दिली जाणार असल्याचं लिहिलं आहे. त्यामुळे ही विचित्र मागणी पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
हेही पाहा- दर्शन रांगेतून अचानक पळत सुटली महिला, भाविकांना बसला धक्का; Video पाहूण नेटकरी म्हणाले “रांगेत…”
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील पिझ्झा शॉपच्या मालकाने त्याच्या दुकानामसमोर जे मुर्ख नाहीत अशा व्यक्तीला नोकरी देणार असल्याचं म्हटलं आहे. NBC-16 न्यूजच्या रिपोर्टनुसार, साउथवेस्ट कोलंबसमध्ये असलेल्या सॅंटिनोज पिझ्झेरियाने आपल्या रेस्टॉरंटसमोर या विचित्र नोकरीच्या जाहिरातीचे पोस्टर लावले आहे. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा- मुलीकडच्या मंडळींनी दिलेल्या हुंड्यावर संशय घेत स्वत:च्या लग्नालाच गैरहजर राहिला नवरदेव
नेटकरी संतापले –
या जाहिरातीचा फोटो व्हायरल होताच अनेकांनी या दुकानदारावर टीका केली आहे. कष्ट करणाऱ्या गरजू कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची जाहिरात देणं म्हणजेच मूर्खपणा असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. शिवाय अशा जाहिरातीद्वारे कर्मचारी भरती करणे हे अपमानास्पद असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने हा बेरोजगारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी, मी मुर्ख नाही पण मला इथे नोकरी करायची नाही अशी गमतीशीर कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे.