Zomato Multiple restaurants order: जेवण्याचे इच्छा नसेल तर आपण नेहमी झोमॅटो किंवा स्विगीवरून जेवण ऑर्डर करतो. हे फूड डिलव्हरी अॅप देशभरात लोकप्रिय आहेत विशेषत: महिलांना फोनमध्ये हे अॅप्स तुम्हाला हमखास मिळू शकतात. तुम्ही जर नेहमी झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता तुम्ही एकावेळी ४ वेगवेगळ्या रेस्तरॉंमधून फूड ऑर्डर करू शकता. कपंनी यूजर्ससाठी नवीन अपडेट आणले आहे. हे नवे फिचर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ऑर्डर करणे आणखी सोपे करेल. फुड डिलिव्हरीचा वेग मंदावला असताना मार्केटमध्ये मोठी भागीधारी मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा – बाईकचा टेबल अन् प्लॉस्टिक पिशवीची प्लेट! घाईघाईत जेवत होता भुकेला डिलिव्हरी बॉय; Video पाहून नेटकरीही झाले भावूक

govt hostel issues suspension notice to students after pizza box found in room
पिझ्झा मागवल्याने विद्यार्थिनींना नोटीस; कुठे घडला हा प्रकार?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
Tawa Prawn Masala Recipe In Marathi)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ‘झणझणीत तवा प्रॉन्स मसाला’ रेसिपी, रविवारी बेत कराच…
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
nutrition , students, twelve recipes , recipes ,
विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहारात बदल; आता बारा पाककृती निश्चित

मिळणार ४ वेगवेगळे कार्ट

फूड डिलिव्हरी अॅपवरून फूड ऑर्डर करताना एकाच रेस्तरॉंमध्ये आपल्याला सर्व गोष्टी मिळत नाही किंवा एका वेळी तुम्हाला वेगवेगळ्या फूड रेस्तरॉं फूड मागवायचे असेल तर तुम्हाला पुन्हा नव्याने ऑर्डर करावे लागते. म्हणजेच एका वेळी झोमॅटोवर एकाच रेस्तरॉंमधून ऑर्डर करावी लागत होती. यामुळे ग्राहकांना विनाकारण संताप होत असे आणि कंपनीचा वेळ यामध्ये जात असे. आता कंपनीने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता झोमॅटोने वेगवेगळ्या रेस्तरॉंमधून ऑर्डर करण्यासाठी चार वेगवेगळे कार्ट दिले आहे ज्याद्वारे तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणजे प्रत्येक कार्टमध्ये वेगवेगळ्या रेस्तरॉंची ऑर्डर निवडू शकता. सर्व कार्टमझ्ये काही ना काही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला सर्वांचे पेमेंट एकाच वेळी करावे लागेल आणि त्यानंतर तुमची ऑर्डर फायनल होईल. जेवण ऑर्डर केल्यानंतर प्रत्येक ऑर्डर वेगवेगळी ट्रॅक करू शकता.

हेही वाचा – डिलिव्हरी बॉयने खास पद्धतीने साजरा केला स्वत:चा वाढदिवस! ग्राहकांना दिली खास भेट, Zomatoकडे लोकांनी केली ‘ही’ मागणी

झोमॅटो आणि स्विगीदरम्यान तगडी स्पर्धा

फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये झोमॅटो आणि स्विगी हे दोन मुख्य स्पर्धक आहेत आणि त्यांची मार्केट व्हॅल्यू ५ बिलियन डॉलरच्या आसपास आहे. सध्या झोमॅटोची भागदारी ५५ टक्के आहे तर स्विगीची भागीदारी ४५ टक्के आहे. पण २०२०मध्ये स्विगीने ५२ टक्क्यांना टॉपवर होते जे आता मागे पडले आहे. मागील तीन वर्षांमध्ये स्विगची मार्केटमधील भागीदारीमध्ये सतत घट होत आहे आणि कंपनीचे नुकसान होत आहे. तसेच आर्थिक वर्ष 2023 मध्ये स्विगीचा महसूल $ ६०० मिलियन वरून सुमारे $ ९०० मिलियन इतका वाढला असला तरी, तरीही कंपनीचा तोटा जास्त आहे. याच कालावधीत स्विगीचा तोटा सुमारे $ ५४५ दशलक्ष आहे तर झोमॅटोचा तोटा सुमारे $११० दशलक्ष आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये खडतर स्पर्धा सुरू आहे आणि दोघेही त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट आणत राहतात.

Story img Loader