ब्रिटनमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका नर्सच्या बेजबाबदार वागण्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. नर्सने एका तासात दोन मोठ्या चूका केल्या अन् त्याचा परिणाम एका रुग्णाच्या जीवनावर झाला. आरोपी नर्सचे रुग्णासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नर्स रुग्णाला रुग्णालयाच्या बाहेर भेटायला बोलवायची. एका कारमध्ये दोघांमध्ये शारिरीक संबंध सुरु असताना रुग्णाला अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर नर्सने त्या रुग्णाला कारमध्येच सोडून पळ काढला आणि त्याचा मृत्यू झाला.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, आरोपी नर्स मागील चार वर्षांपासून ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. याचदरम्यान एका रुग्णासोबत तिचे जवळचे संबंध बनले. ती रुग्णालय प्रशासनाला न सांगताच रुग्णाला गुपचूप भेटायला जायची. पोलिसांनी तिच्या फोनमध्ये या प्रकरणाबाबतचे संशयास्पद मेसेज मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखली केली आणि तपास सुरु केला. कारमध्ये रोमान्स करत असताना रुग्णाला हृदय विकाराचा झटका आला पण तिने रुग्णालयात याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला.
नक्की वाचा – सावधान! समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताय? मग ‘हा’ धक्कादायक Video एकदा पाहाच
रुग्णालयात काय घडलं?
आरोपी नर्सने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना खोटं सांगण्याचा प्रयत्न केला. पण अखेर सत्य समोर आलं. चौकशी दरम्यान तिने सांगितलं की, तो रुग्ण डायलिसिस करण्यासाठी येत होता. त्याला छातीचा त्रास होता, असा जबाब तिने पोलिसांना दिला. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नर्सने खोटा जबाब दिल्याचं स्पष्ट झालं. ज्या मित्राला तिने सीपीआर देण्यासाठी बोलावलं होतं, त्यानेही तिच्याविरोधात साक्ष दिली. त्यानंतर नर्सला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.