Nurse Kills 7 New Born Babies In Hospital : सात नवजात बालकांची एका नर्सने हत्या केल्याची धक्कादायक घटना इंग्लंडच्या एका रुग्णालयात घडली आहे. दुधात विष मिसळून या बालकांची हत्या केल्याचा आरोप नर्सवर लावण्यात आला होता. नर्सने १३ बालकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. यापैकी सात बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय वंशाच्या एका डॉक्टरने या प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले आणि आरोपी नर्सला न्यायालयात बालकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॅनचेस्टर क्राऊन न्यायालयात आरोपी नर्स लूसी लेटबीला (३३) सात बालकांची हत्या आणि अन्य सहा बालकांच्या हत्येचा कट रचल्याने दोषी ठरवण्यात आलं. सोमवारी आरोपी नर्सला या न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याबाबत इंग्लंडच्या चेस्टर शहरातील काउंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयात असणाऱ्या मूळचे भारतीय असणारे डॉक्टर रवी जयराम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वेळेवर या नर्सची माहिती मिळाली असती, तर पोलिसांनाही सतर्क राहता आलं असतं.

नक्की वाचा – सेक्सला नकार दिल्याने प्रेयसीला स्क्रू ड्रायव्हरने भोसकलं, तरुणी रुग्णालयात दाखल होताच पोलिसांना कळलं अन्…

जयराम यांनी म्हटलं की, चार-पाच मुलं अशी आहेत जे शाळेत जाऊ शकतात. पण काही कारणास्तव जाऊ शकत नाहीत. २०१५ ते २०१६ दरम्यान आरोपीने हत्या केल्या. जेव्हा तीन हत्या झाल्याचं उघड झालं त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणासंबंधीत अनेकदा बैठक घेण्यात आल्या. त्यानंतर अखेर एप्रिल २०१७ मध्ये नॅशनल हेल्थ सर्विस ट्रस्टने नर्सला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. आमच्या समस्यांबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. १० मिनिट आमची बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि आरोपी नर्स लेटबीला अटक केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurse kills 7 new born babies in the hospital by giving them poisonous milk police arrested culprit with the help of indian doctor nss