व्हायग्राच्या वापरामुळे करोना व्हायरसमुळे कोमात गेलेल्या नर्सचा जीव वाचल्याची बातमी वेगाने व्हायरल होत आहे. ३७ वर्षीय मोनिका आल्मेडा २८ दिवसांपासून कोमात होत्या आणि त्यांना आराम मिळत नव्हता. दिवसेंदिवस कमी होत असलेल्या ऑक्सिजनच्या पातळीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होत चालली होती. अशा परिस्थितीत मोनिकासोबत काम करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांनी व्हायग्राच्या मदतीने तिला कोमातून बाहेर काढले. त्याच्या सहकर्मचाऱ्यांनी सुचवले की जर रुग्णाला इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी औषधाचा डोस दिला तर त्याची ऑक्सिजन पातळी वाढू शकते. यानंतर उपचाराची ही अनोखी कल्पना कामी आली आणि ती कोमातून बाहेर आली.
नर्स असलेल्या मोनिकाने करोना महामारीच्या काळात एनएसएच लिंकनशायर येथील रुग्णालयात सेवा देत होत्या. तिथे तिला करोनाची लागण झाल्यांतर रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. मात्र १४ नोव्हेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिंकन काउंटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोनिकाची ऑक्सिजनची पातळी सतत घसरत असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला १६ नोव्हेंबरला आयसीयूमध्ये हलवले, तेथून ती कोमात गेली. नीट श्वास घेता येत नसल्याने मोनिकाच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह कमी होऊ लागला. दरम्यान, मोनिकाच्या सहयोगी परिचारिकांच्या सूचनेनंतर डॉक्टरांनी तिला व्हायग्राचा डोस दिला. व्हायग्राच्या प्रभावामुळे धमन्या रुंद होतात आणि रक्तप्रवाह जलद होतो. त्यामुळे फुफ्फुसेही ऑक्सिजन मुक्तपणे घेऊ शकतात. या उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि १४ डिसेंबरला कोमातून बाहेर आली.
Viral: लग्न मंडपात नवरा करत होता मस्करी; वधूने शिकवला असा धडा की…
उपचारानंतर ३७ वर्षीय मोनिका अल्मेडा यांची प्रकृती स्थिर आहे. आता मोनिका यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. लिंक्सच्या गेन्सबरो येथे राहण्याऱ्या मोनिकांना शुद्ध आली तेव्हा तिला डॉक्टरांना याबाबतची माहिती दिली. मात्र तिचा यावर विश्वास बसला नाही. मात्र त्यानंतर त्यांनी खरंच असं केल्याचं सांगितलं. “मला व्हायग्रा मदतीने शुद्धीत आणलं गेलं. व्हायग्राच्या डोसमुळे माझ्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढली आणि माझी फुफ्फुसं योग्य प्रतिसाद देऊ लागली. हा माझ्यासाठी चमत्कार होता”, असं मोनिका यांनी सांगितलं.