Nvidia कंपनीचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत तब्बल ३,७७६ टक्क्यांनी वाढले आहेत. स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांत म्हणजेच जून २०२४ मध्ये कंपनी जगातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी झाली. परिणामी कंपनीचे एक संस्थापक सीईओ जेन्सन ह्युआंग यांच्या एकूण संपत्तीमध्ये फक्त एका दिवसात तब्बल ४ बिलियन डॉलर्स इतकी भर पडली. आज जेन्सन ह्युआंग जगातले १२व्या क्रमांकावरचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी नवोदित उद्योजकांमध्ये उत्सुकता असताना त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलची चर्चा सुरू झाली आहे. या प्रोफाईलवर जेन्सन ह्युआंग यांनी पूर्वानुभव नमूद केला आहे.

लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रामुख्याने व्यावसायिक स्वरूपाच्या अपडेट्स, रोजगारासंदर्भातल्या पोस्ट आणि तत्सम इतर अपडेट्स शेअर होत असतात. त्यामुळे अगदी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण मंडळींपासून बाजारपेठेतील दिग्गजांपर्यंत सर्वांचे प्रोफाईल त्यांच्याविषयीची व्यावसायिक स्वरूपाची माहिती पुरवत असतात. अशाच बलाढ्य दिग्गजांपैकी एक असणारे Nvidia चे सीईओ जेन्सन ह्युआंग यांचं प्रोफाईल सध्या भलतंच चर्चेत आलं आहे.

Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
savita malpekar marathi actress talks about groupism
“त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

डिशवॉशर, वेटर म्हणून पूर्वानुभव!

अब्जावधींची संपत्ती गाठीशी असणारे Nvidia चे सीईओ ह्युआंग यांचा लिंक्डइन प्रोफाईल म्हणजे डझनभर कंपन्यांमधला अनुभव, महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या आणि भरगच्च असा पूर्वानुभवाचा रकाना अशा गोष्टींची साधारण कल्पना केली जाऊ शकते. पण वास्तवात ह्युआंग यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर फक्त दोन ठिकाणी काम केल्याचा पूर्वानुभव नमूद केला आहे.

जेन्सन ह्युआंग यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवरील पूर्वानुभवाच्या रकान्यात त्यांनी डिशवॉशर, बसबॉय आणि वेटर म्हणून काम केल्याचा उल्लेख आहे. १९७८ ते १९८३ या पाच वर्षांत डॅनीज नावाच्या एका हॉटेलमध्ये ह्युआंग यांनी हे काम केलं होतं. त्यानंतरचा त्यांचा अनुभव थेट एनविडियाचे संस्थापक व सीईओ म्हणून आहे. १९९३ सालापासून त्यांनी एनविडियाचे सीईओ म्हणून काम केलं असून त्यांचा आत्तापर्यंतचा एनविडियामधला अनुभव तब्बल ३१ वर्ष ८ महिने इतका नोंदवण्यात आल्याचं त्यांच्या प्रोफाईलवरून दिसत आहे.

विश्लेषण: Nvidia च्या उत्तुंग भरारीचे गमक कशात?

६१ वर्षीय जेन्सन ह्युआंग यांनी याआधी अनेकदा त्यांच्या पूर्वायुष्याबाबत खुलासे केले आहेत. या वर्षी मार्च महिन्यात ह्युआंग यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये डॅनीजसाठी काम केल्याच्या अनुभवाचा उल्लेख केला. “माझ्यासाठी कोणतंही काम छोटं नाही. कारण मी डिशवॉशर म्हणून काम केलं आहे. मी शौचालयं साफ करायचो. मी खूप सारी शौचालयं साफ केली आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळूनही जेवढी केली नसतील, तेवढी मी साफ केली आहेत”, असं त्यांनी म्हटलं होतं.