Obscene Video Viral: एका लाजिरवाण्या घटनेत उत्तराखंडमधील कोटद्वार येथील रुग्णालयात एक विकृत माणूस हस्तमैथुन करताना कॅमेऱ्यात कैद झाला. पौरी गढवालच्या कोटद्वार येथील सरकारी रुग्णालयात ही घटना घडली आहे, जिथे एका तरुणानं महिला वॉर्डमध्ये प्रवेश केला आणि उघडपणे अश्लील कृत्य केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला वॉर्डमध्ये एका खाटेजवळ उभा राहून तो पुरुष हस्तमैथुन करीत आहे.
FPJच्या वृत्तानुसार, ही घटना बुधवारी (१३ नोव्हेंबर) घडली आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वॉर्डमध्ये एका परिचारिकेला पाहून त्या व्यक्तीने असभ्य वर्तन केल्याचे वृत्त आहे. वॉर्डमध्ये पुरुषाला हस्तमैथुन करताना पाहून महिला वॉर्डमधील महिला रुग्णांनी तिथला गजर वाजवला. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे त्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, वॉर्डमधील एका महिला रुग्णाने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
रुग्णालयातील विकृत माणसाचं अश्लील कृत्य व्हायरल
या प्रकरणाची तक्रार स्थानिक व वकिलांनी केल्यानंतर त्यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही कायदेशीर कारवाईचे कोणतेही वृत्त नाही आणि अद्याप त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी फुटेज तपासले असून, आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलीस करत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ @askbhupi या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “महिला सुरक्षेच्या नावाखाली उत्तराखंडमधील रुग्णालयांमध्ये निष्काळजीपणा केला जात आहे. हा व्हिडीओ पौरी गढवाल येथील कोटद्वार बेस रुग्णालयाचा आहे, जिथे एक तरुण महिलांच्या वॉर्डमध्ये घुसला आणि अश्लील कृत्य करताना आढळला. हा व्हिडीओ काल रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.”
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांकडून प्रतिक्रिया येत असून, आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “कारवाईच्या नावाखाली काहीच होणार नाही. तो दोन दिवस तुरुंगात राहील आणि नंतर त्याची सुटका होईल. नंतर कुठेतरी अशीच कृत्ये करील.” दुसऱ्याने “लोकांनी यांचे हात पाय तोडले पाहिजेत. कारण- पोलीस तर यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करीत नाही.” एक जण कमेंट करीत म्हणाला, “या देशातील काही लोकांची मानसिक स्थिती बिघडली आहे. वेळीच योग्य उपचार आवश्यक आहेत.” “इथेही महिला असुरक्षित आहेत,” अशी कमेंट एकाने केली.