एक चॉकलेट खाल्ल्यानंतर महिला करोडपती झाली असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच चॉकलेटचा करोडपतीशी काय संबंध आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. खरं तर, ब्रिटनमधल्या एका महिलेला चॉकलेटची खूप आवड होती. नेहमीप्रमाणेच तिने ५०० रुपयांचे चॉकलेट्स खरेदी केले. पण या चॉकलेटनं तिचं नशीबंच पाटलून गेलं, इतकं की ती रातोरात करोडपती झाली. एका चॉकलेटमुळे ही महिला करोडपती झाली कशी, हे जाणून घ्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनमधील नॅनटविच येथील एका सुपरमार्केटमध्ये ऑफर सुरू होती. या सुपरमार्केटमधून चॉकलेट खरेदी करणाऱ्यांना लॉटरी जिंकण्याची संधी दिली जात होती. अशा ऑफर्स बाजारात रोज मिळत असल्याने त्या महिलेचा यावर विश्वास बसला नाही. पण तिला चॉकलेट आवडलं म्हणून तिने ते दुकानातून विकत घेतले. पण या महिलेचं नशीब बलवत्तर होतं की तिला चॉकलेटच्या रॅपरमधून सोन्याचं तिकीट मिळालं. मग काय उरलं होतं? महिला एका रात्री करोडपती झाली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : किती गोड! बाप लेकीच्या डान्सचा हा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

सीन वॉकर नावाच्या महिलेने ही लॉटरी जिंकली आहे. ४३ वर्षीय सियान आपल्या मुलासोबत चॉकलेट्स घेण्यासाठी बाजारात पोहोचली होती. चॉकलेट खरेदी करताना महिलेला कल्पनाही नव्हती की ती खरेदी करत असलेल्या ५०० रुपयांच्या बदल्यात तिला लाखो रुपये मिळणार आहेत.

या महिलेने सांगितलं की, चॉकलेट खाताना आई आणि मुलगा दोघांनाही त्यातून सोन्याचं तिकीट मिळालं. याची किंमत ५ हजार ब्रिटिश पौंड (भारतीय चलनात सुमारे ५ लाख रुपये) होती. सियान वॉकरने सांगितलं की, जेव्हा तिला चॉकलेटच्या आतून हे तिकीट मिळालं तेव्हा तिचा नशिबावर विश्वास बसला नाही. पण तुम्ही लाखो रुपये जिंकलेत, असं सांगितल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हातात आईचा फोटो… डोळ्यात अश्रू! या पाकिस्तानी नववधूची एन्ट्री पाहून तुम्ही भावूक व्हाल…

सियान ही एकमेव महिला नाही जिला हे गोल्डन तिकीट मिळालं आहे. अशी सोनेरी तिकिटे कंपनीने २४ चॉकलेट्समध्ये लपवून ठेवली होती. वॉकर व्यतिरिक्त आणखी २३ व्यक्तींना हे बक्षीस मिळायचं बाकी आहे. कंपनीचं म्हणणे आहे की, त्यांनी चॉकलेट्समध्ये ५ ते १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे लपवली आहेत. आता बघूया पुढचा सीन वॉकर कोण असेल?

Story img Loader