गेल्या काही दिवसांपासून एक विचित्र पण आश्चर्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन फिटनेस फ्रीक मित्र त्यांच्या दररोजच्या ट्रेनिंग रूटीनचा भाग म्हणून बर्फाळ जंगलात वर्कआऊट करत होते. या व्हिडीओची सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे यामध्ये एक अस्वल देखील दिसत आहे. एक मोठा तपकिरी रंगाचा अस्वल देखील या वर्कआऊ सेसनचा एक भाग बनताना दिसून येत आहे. हा भलामोठा अस्वव मागे झाडाच्या फांदीसोबत पुश-अप करताना दिसतो.
हा व्हिडीओ @platini954 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही दोन व्यक्ती वर्क आऊट करताना पाहू शकता. यामध्ये एक व्यक्ती झाडाला धरून कोअर वर्कआउट करत आहे, तर दुसरी व्यक्ती हळू हळू पंच मारून बॉक्सिंगचा सराव करत आहे. मग मागून एक अस्वलही झाडाला हलवून या दोन मित्रांची नक्कल करू लागतो. अस्वल सुद्धा काहीतरी कसरत करत असल्याचं दिसतं.
आतापर्यंत या व्हिडीओला ट्विटरवर २९.२ मिलियन म्हणजेच २.९२ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र अनेक यूजर्सचे म्हणणे आहे की हा व्हिडीओ रशियाचा असू शकतो. ही व्हिडीओ क्लिप पाहून तमाम नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : अस्वलाच्या वाटेत अचानक आला भलामोठा वाघ, दोघांच्या लढाईत नक्की कोण जिंकलं ?
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL : अवघ्या ६ महिन्याच्या बाळाला एकाच वेळी बसवले ह्रदय आणि इम्यून ग्लॅंड
सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित असे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. काही काळापूर्वी अस्वलाचाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अस्वलाने फ्लोरिडा येथील रहिवासी वॉल्टर हिकॉक्स यांच्या घरात घुसून त्याच्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर वॉल्टरने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः अस्वलाचा सामना केला. आपल्या धाडसाने वॉल्टरने अस्वलाला हुसकावून लावले.