आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सध्या सर्वत्र बोलबोला सुरूआहे. कोणी म्हणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील तर कोणी एआय तंत्रज्ञान वापरुन अशक्य वाटणाऱ्या कल्पना फोटोच्या स्वरुपात साकारत आहेत. रोज नवनवीन एआय फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. या नव्या तंत्रज्ञानांचा वाढता प्रभाव पाहता अनेक कंपन्यांनी एआयचा वापर सुरू केला आहे. एवढंच नव्हे तर आता बातम्या सांगण्यासाठी सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. होय! तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण नुकतेच एका न्युज चॅनलने एक एआय अँकर लॉन्च केली आहे.

ओडीसामधील एका खासगी चॅनलने रविवारी आर्टफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने एक व्हर्च्युअल न्यूज अँकर लॉन्च केली आहे. कंपनीद्वारे जाहीर व्हिडीओनुसार, या व्हर्च्युअल एआय अँकरने ओडीसाची हँडलूम साडी नेसलेली आहे. ही आर्टिफिशिअल महिला अँकर ओटीव्ही नेटवर्कच्या टिव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ओडीया आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये बातम्या सांगत आहे.

हेही वाचा – चौथी मांजर कुठे आहे? तुम्ही खरचं Cat Lover असाल तर ५ सेंकदात सांगा उत्तर

ओडिया आणि इंग्रजी भाषेत बातम्या सांगते ‘लिसा

कंपनीच्या निवेदनानुसार, ओटीव्ही नेटवर्कच्या टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर बातम्या सांगण्यासाठी लिसाला प्रोग्राम केले गेले आहे. एआय अँकर लिसा कित्येक भाषेंमध्ये संवाद साधू शकते पण सध्या ती फक्त ओडिया आणि इंग्रजी भाषेमध्येच बातम्या वाचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओटीव्ही ओडीया न्युज चॅनलची पहिली एआय न्युज अँकर ‘लिसा’ टिव्ही पत्रकारितेसाठी एक मौल्यवान भेट ठरणार आहे.

आगामी काही दिवसांत लिसा ओडियामध्ये अधिक प्रभावीपणे कार्य करू शकेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही लिसाला शोधू शकता आणि फॉलो करू शकता.

हेही वाचा – किसिंग आणि भांडणानंतर आता दिल्ली मेट्रोत दोन तरुणींनी केला ‘पोल डान्स’; Video पाहून लोक म्हणाले…

येत्या काळात आणखी प्रभावीपणे काम करणार एआय न्यूज अँकर

एआय न्यूज अँकर हे संगणक-निर्मित मॉडेल आहेत जे सामान्य भाषा वापरून आणि प्रत्यक्षात माहिती सांगण्यासाठी आणि चेहऱ्यावरील हावभाव निंयत्रित करण्यासाठी सखोल अभ्यास करत आहे. काही AI न्यूज अँकर रिअल-टाइममध्ये दर्शकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असतात.

तज्ञांचा असा विश्वास आहे की, एआय न्यूज अँकरमध्ये बातम्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. ते ब्रेकिंग न्यूजचे २४/७ कव्हरेज देऊ शकतात आणि त्यांचा वापर एखाद्या प्रेक्षकांसाठी बातम्या वैयक्तिकृत करण्यासाठी(personalized) केला जाऊ शकतो. पण, चुकीची माहिती पसरवण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी एआय न्यूज अँकर वापरल्या जाऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली जात आहेत.

Story img Loader