बलाढ्य डोंगर २२ वर्षे फोडून त्यातून रस्ता बनवणारे दशरथ मांझी यांना सारं जग ओळखतं आणि कुठेतरी याच ‘माऊंटन मॅन’पासून प्रेरणा घेत ओडिशामधल्या एका वडिलांनी आपल्या मुलाला शाळेत जाता यावं यासाठी ८ किलोमीटरचा रस्ता खोदला आहे.
जलंधर नायक असं या व्यक्तींचं नाव असून ते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. भाजी विक्री करून झाल्यानंतर दिवसातले आठ तास ते डोंगर फोडून त्यातून रस्ता तयार करण्याचं काम करतात. जलंधर हे गुमशाही गावात राहतात. या गावात रस्ता नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गावकऱ्यांना संपूर्ण डोंगर ओलांडून जावा लागतो. गावात पक्का रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. पण गावात रस्ता नसल्यानं आपल्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून डोंगर फोडून रस्ता तयार करत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ८ किलोमीटर रस्ता तयार केला तर पुढील ३ वर्षांत त्यांना ७ किलोमीटर रस्ता तयार करायचा आहे. जलंधर यांना लहान मुलगा आहे. रस्ता नसल्यानं त्याला शाळेत जाण्यासाठी अडचणी येतात.
तापमान -७० अंश सेल्सिअस., रशियातल्या ‘या’ गावात असते हाडं गोठवणारी थंडी
सेल्फीसाठी आईपासून विलग केलेल्या हत्तीच्या पिल्लाचा २४ तासांत मृत्यू
आपल्याला शिकता आलं नाही. पण, आपल्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी ते धडपडत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी देखील घेतली आहे. रस्ता तयार करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्या दिवसांचा त्यांना नक्कीच मोबदला देण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.