अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Odisha Railway Accident Viral Photo: लाइटहाऊस जर्नलिझमला काही फोटो सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असल्याचे लक्षात आले. या फोटोजमध्ये दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे दिसत आहे आणि असा दावा केला जात आहे की पंतप्रधान ओडिशा रेल्वे अपघात दुर्घटनाग्रस्तांना भेटण्यासाठी येणार असल्याने आता अचानक कटकच्या सरकारी रुग्णालयात नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Naveen N, जे डीएमके सदस्य आहेत, यांनी ट्विटरवर व्हायरल फोटो शेअर केले आहेत.

इतर वापरकर्ते देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल इमेजेसवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. असे केल्यावर आम्हाला आढळून आले की हे चित्र ‘जनरल हॉस्पिटल, मोरबी’ येथील आहेत. पुढे शोधल्यावर आम्हाला अनेक लेख सापडले ज्यात दोन फोटो आहेत.

बिझनेस टुडेवरील एका लेखात म्हटले आहे: सफाई कर्मचाऱ्यांनी व बांधकाम करणाऱ्या मजुरांनी इंडिया टुडेला सांगितले की, त्यांना पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी दुरुस्तीसाठी राजकोटहून त्यांना पाचारण करण्यात आले होते. आता हॉस्पिटलमध्ये नवीन वॉटर कुलर आणि हॉस्पिटलचे बेडही बसवण्यात येत आहेत.

https://www.businesstoday.in/latest/politics/story/congress-aap-criticise-bjp-for-overnight-makeover-of-morbi-civil-hospital-ahead-of-pm-modis-visit-351404-2022-11-01

हे आर्टिकल १ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. आम्हाला असेच काही फोटो बाकी वेबसाईट्स वर देखील मिळाले.

https://www.indiatoday.in/india/story/gujarat-morbi-bridge-collapse-pm-modi-visit-civil-hospital-paint-aap-congress-2291698-2022-11-01

आम्हाला इंडिया टुडे वर एक लेख देखील सापडला, जिथे मोरबी रुग्णालय प्रशासनाने यावर कमेंट केल्याचे सांगण्यात आले होते. रुग्णालयाने सांगितले की, “दर काही महिन्यांनी होणाऱ्या आता हे काम सुरु आहे व असे अनेक रुग्णालयांमध्ये होत आहे.”

https://www.indiatoday.in/india/story/routine-work-morbi-hospital-opposition-slams-renovation-work-pm-modi-visit-2291880-2022-11-01
https://theprint.in/india/ahead-of-modis-visit-gujarats-morbi-hospital-gets-overnight-makeover-after-bridge-tragedy/1190565/

हे ही वाचा<< २०० वर्षीय बौद्ध भिख्खू जेव्हा आशीर्वाद देतात… Viral Video पाहून नेटकरी भारावले पण मूळ सत्य वाचून व्हाल चकित

निष्कर्ष: ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर आता मोरबी सिविल हॉस्पिटल येथील १ नोव्हेंबर, २०२२ रोजी चे फोटो व्हायरल होत आहेत. मोरबी पूल कोसळून १३४ जणांचा मृत्यू झाला होता यावेळी पंतप्रधान मोदींनी याठिकाणी भेट दिली होती. सध्या जो दावा करण्यात येत आहे की, हे व्हायरल फोटो अलीकडेच झालेल्या ओडिशा दुर्घटनेनंतर कटक येथील हॉस्पिटल मध्ये काम सुरु असल्याचे आहेत.