काही लोकांसाठी नॉनव्हेज म्हणजे जीव की प्राण असतो, नॉनव्हेज खाण्यासाठी लोक एक संधी सोडत नाहीत. मग ते एखादं फेमस हॉटेल असूदेत नाहीतर कुणाचं लग्न, सगळीकडे हे पोहचतात. सध्या अशाच एका लग्नातील मटणाच्या मेन्यूवरून उडालेल्या गोंधळाची चर्चा सोशल मीडियावर होतेय. ओडिसातील सुंदरगढ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या वऱ्हाडी मंडळींना रिकाम्या हाताने परतावे लागले. कारण, लग्नात वऱ्हाड्यांना मटण कमी पडले. त्यानंतर वराकडून आणखी मटणाची मागणी करण्यात आली. पण, वधूने ही मागणी पूर्ण न करता आपलं लग्न मोडलं.

मटण नाही लग्न नाही

संबलपूर जिल्ह्यातील धामा भागात असलेल्या वधूच्या घरी ही विचित्र घटना घडली आहे. वर हा मूळचा संबळपूरचा रहिवासी आहे. एका बँकेत बँकर असलेल्या वराने रविवारी वराडासह मिरवणूक काढली आणि तो संबलपूरमधील ऐंथापली येथे वधूच्या घरी पोहोचला. मेजवानीच्या वेळी शेवटच्या सात-आठ वऱ्हाड्यांना मटण कमी पडले.दरम्यान, रात्री उशीर झाल्याने वधूच्या कुटुंबीयांनी त्या वेळी मटणाची व्यवस्था करु शकले नाही.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

मटणाची मागणी केल्याने वधूने मोडलं लग्न

या घटनेबद्दल बोलताना वधू म्हणाली, सर्व काही व्यवस्थित होते. अगदी मटण पण दिले होते. पण शेवटचे सहा-सात जण जेवू शकण्यापूर्वीच ते संपले. मग त्यांनी माझ्या वडिलांवर गैरव्यवस्थापनाचा आरोप करत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. माझ्या पालकांनी आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना शांत राहण्याचा आग्रह केला आणि त्याऐवजी चिकन आणि मासे देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या मटणाच्या मागणीवर ठाम होते आणि आमच्याशी गैरवर्तन करू लागले.

हेही वाचा – तब्बल १०० दिवस ‘तो’ समुद्र तळाशी राहिला, सुर्यप्रकाश पाहिला नाही, मात्र १० वर्षांनी वाढलं वय!

वधूने पुढे बोलताना सांगितलं की, माझ्या वडिलांनी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन विनवणी केली, पण ते त्यांच्या मागणीवर अडून राहिले. हे मला चुकीचे वाटले त्यामुळे मी लग्न न करता तेथून जाण्यास सांगितले. यापूर्वी आदिवासीबहुल कंधमाल जिल्ह्यात नुकतीच अशीच एक घटना समोर आली होती. जेव्हा एका वधूने तिच्या पतीने हुंड्यात दुचाकी मागितल्याने सासरचे घर सोडले होते.

Story img Loader