Colleagues Arguing Over Hindi Use On Zoom Call Video Viral : अनेकदा ऑफिसच्या झूम कॉल मीटिंगदरम्यान अशा काही घटना घडतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. सध्या सोशल मीडियावर एका ऑनलाइन मीटिंगचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कर्मचारी आपापसात भांडताना दिसत आहेत. ज्याचं कारण जाणून तुम्हीही चकित व्हाल. या मीटिंगमध्ये हिंदीत बोलण्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका ऑफिसचे कर्मचारी ऑनलाइन झूम मीटिंगमध्ये नवीन वर्षाचे नियोजन करताना दिसत आहेत. यावेळी एक कर्मचारी हिंदीत आपले मत मांडू लागते. ज्यानंतर दुसरी व्यक्ती त्याला अडवते, कारण त्याच्याबरोबर असलेल्या इतर अनेकांना हिंदी समजत नसते; त्यामुळे त्याने इंग्रजीत आपले मत मांडावे, असे प्रत्येकाचे मत असते. यानंतर तो काही सेकंद इंग्रजीत बोलतो आणि पुन्हा हिंदीत बोलण्यास सुरुवात करतो. ज्यामुळे मीटिंगमध्ये उपस्थित कर्मचारी चिडतात आणि त्यांचा आपापसातच शाब्दिक वाद सुरू होतो. यावेळी एका कर्मचाऱ्याने तो हिंदीत बोलणाऱ्या कर्मचाऱ्याची मतं भाषांतर करून सांगतो, असे सांगून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसर्या कर्मचाऱ्याने छोट्या गोष्टीवरून भांडण न करण्याची विनंती केली. मात्र, संतप्त कर्मचाऱ्यांनी ते मान्य न करता त्यांच्याच भाषेत बोलण्यास सुरुवात केली.
Video: ट्रॅक्टर आहे की रेल्वेची मालगाडी! रस्त्यावरचे ‘हे’ दृश्य पाहताच लोकांनी धरले डोके!
मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, असा दावा केला जात आहे की, हा एक स्टेज व्हिडीओ आहे, जो मनोरंजनासाठी बनवला गेला आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर संतापले लोक
लोक या व्हिडीओवर जोरदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी हिंदीत बोलणाऱ्या व्यक्तीचे समर्थन केले, तर काही लोकांचे वेगळे मत आहे. एका युजरने लिहिले की, हे मजेशीर आहे की त्यांच्यापैकी कोणालाही इंग्रजीत संभाषण करण्यात काही अडचण येत नाही, पण जर कोणी हिंदी बोलू लागले तर त्यांना राग येतो. चला, तुम्हाला हिंदी समजत नसेल तर नम्रपणे तसं सांगा, तुम्हाला थोडंफार हिंदी कळत असेल, तर दोन-तीन वाक्ये समजायला हरकत नाही.
आणखी एका युजरने लिहिले की, माझ्या १६ वर्षांच्या आयटी कारकिर्दीत मी कोणत्याही टीम मीटिंगमध्ये प्रादेशिक भाषेवर चर्चा करायला सुरुवात केली नाही, कारण आम्हाला माहीत आहे की, प्रत्येकाला सर्व भाषा समजत नाहीत, म्हणून इंग्रजी हा सोपा पर्याय ठेवला. तिसऱ्या युजरने लिहिले की, मी यावर तामिळींसोबत आहे. जर तुमच्याकडे एकही व्यक्ती असेल, ज्याला तुम्ही काय म्हणत आहात ते समजत नसेल, तर कॉर्पोरेट भाषेत म्हणजे इंग्रजीमध्ये बोला.