सध्या उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) उदित पवार यांच्या कार्यालयातील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एसडीएम उदित पवार यांच्या कार्यालयात एक व्यक्ती कोंबडा झाल्याचं दिसत आहे. तर एसडीएम यांनी या तक्रारदाराला कोंबडा बनण्यास सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. एसडीएम कार्यालयात कोंबड्याच्या स्थितीत बसलेल्या तक्रारदाराचा व्हिडीओ कोणीतरी बनवला होता. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोंबडा बनायला लावलेल्या व्यक्तीचं नाव पप्पू लोधी असं आहे. ४२ वर्षीय पप्पू लोधी यांनी सांगितलं की, मी एसडीएम उदित पवार यांच्या कार्यालयात मंदिराशेजारील जमिनी संदर्भात अतिक्रमणाची तक्रार करण्यासाठी गेलो होतो. यावेळी त्यांनी मला कोंबडा बनायला लावलं. तर लोधी यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांना कोंबडा बनवण्याचे आदेश दिल्याचा आरोप पवार यांच्यावर करण्यात येत आहे.

हेही पाहा- दुचाकीवरील तरुणाने ओढणी ओढल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू…, अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ आला समोर

एसडीएमच्या आदेशावरून तक्रारदार कार्यालयातच कोंबडा बनला यावेळी त्याचा कोणीतरी व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केला. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. हे प्रकरण जिल्हा दंडाधिकारी शिवकांत द्विवेदी यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी झालेल्या व्हिडिओची दखल घेत त्याची चौकशी केली. तपासादरम्यान, एसडीएम उदित पवार यांचा प्रथमदर्शनी निष्काळजीपणा दिसून आल्याचं सांगितलं.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर एसडीएम उदित पवार यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तक्रारदार स्वेच्छेने कोंबडा झाल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्याच्या मित्रांनी व्हिडिओ आणि फोटो काढले. मी कोणाला कोंबडा होण्यास सांगितले नाही, असंही एसडीएम पवार यांनी सांगितलं. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेली प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोपी एसडीएमवर झालेल्या कारवाईवर जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officer makes man kneel in murga position in up suspended as bareilly viral video goes viral jap
Show comments