मगर अशी आहे की, जी कोणालाही जिवंत गिळू शकते. तिला माणसाला आपलं जेवण बनवण्यासाठी तिला एक क्षणही पुरतो. एखादा छोटा प्राणी त्याच्या तावडीत आला तर तो क्षणार्धात मृत्यूच्या मुखात जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोकादायक मगरीने गिळला कुत्रा

या व्हिडीओमध्ये एक खतरनाक मगर कुत्र्याला गिळताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर एक चमत्कार घडतो आणि कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी एक वृद्ध व्यक्ती तिथे येते. यानंतर काय होते ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लहान नदीच्या काठावर फिरायला गेलेल्या कुत्र्याला एक धोकादायक मगर गिळत आहे. ती मगर कुत्र्याला सोडल्यानंतर पाण्यात जात आहे, तेव्हा तेथे एक वृद्ध व्यक्ती आली. त्याची नजर मगरीवर पडते आणि त्याने कुत्र्याला वाचवण्यासाठी थेट नदीत उडी मारली.

( हे ही वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ शहरात १० हजार रुपये लिटरने विकले जात आहे गाढवाचे दूध, खरेदी करणाऱ्यांची लागलीये लाइन )

कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी वृद्धाने मारली नदीत उडी

कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी वृद्ध व्यक्ती आपल्या जीवाची पर्वाही करत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तो नदीच्या आत खोलवर गेला. यानंतर, त्याने मगरीला हाताने पकडले आणि त्याच्या पाठीवर चढून त्याचे तोंड उघडून आणि कुत्र्याला बाहेर काढले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वृद्ध व्यक्ती कुत्र्याला मगरीच्या तोंडातून पकडून बाहेर काढत आहे. यानंतर कुत्रा मगरीच्या तोंडातून बाहेर येतो आणि संधी मिळताच पळून जातो.

( हे ही वाचा: Viral Video: कालव्याच्या काठावर उभं राहून ही तरुणी घेत होती सेल्फी, आणि मग… )

( हे ही वाचा: नवीन वर्षात या ४ राशींवर राहील लक्ष्मीची कृपा, व्यवसाय असो किंवा नोकरी, सर्वत्र मिळेल यश )

ट्विटरवर @em4g1 नावाच्या अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघायला खूपच धोकादायक वाटतो. हे पाहून कोणीही हादरून जाईल. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण वृद्धांचे कौतुक करत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ohh the crocodile swallowed the dog and the old man jumped into the river to save it captured in thrilling video camera ttg