तुमच्या परिसरात एखादी मिरवणूक, वाढदिवस किंवा एखाद लग्न असेल तर काही मर्यादित वेळेपुरतं बँजो, डीजे वाजवण्याची परवानगी असते.
काही ठिकाणी १० नंतर डीजे किंवा मोठ्याने गाणी वाजवण्यास सक्त मनाई असते. जर गाणी बंद नाही केली तर अश्या ठिकाणी स्थानिक पोलीस पोहचतात आणि डीजे बंद करण्यास सांगतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कार्यक्रमात गाणी चालू राहण्यासाठी इथे काही मित्रांनी मिळून हटके जुगाड केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका घरात लग्नसमारंभ सुरु असतो. हळदी आणि संगीत हा कार्यक्रम एकाच दिवशी ठेवण्यात आलेला असतो. तर नवरीला हळद लावेपर्यंत डीजेचा टाइम निघून गेला आणि रात्री ११ वाजता संगीत कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे आणि रात्री १ वाजेपर्यंत हा डीजे हळू आवाजात चालू होता. पण, नंतर पोलीस अधिकारी आले आणि डीजे बंद करावा लागला. तसेच यादरम्यान फक्त नवरीचा डान्स परफॉर्मन्स बाकी होता. तर नवरीचा डान्स परफॉर्मन्ससाठी कोणता खास जुगाड करण्यात आला हे तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…Atal Setu: अटल सेतूची पहिली झलक पाहून आनंद महिंद्रानी ठेवलं ‘असं’ हटके नाव! पोस्ट पाहून म्हणाल, ‘हे तर खूपच…’

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरचा एक मित्र त्याची ओला स्कूटर घेऊन आला आणि त्यावर त्याने गाणं लावले आणि नवरीचा डान्स अशा खास पद्धतीत पूर्ण झाला. तसेच नवरीची स्वतःच्या लग्नात डान्स करण्याची इच्छा पूर्ण झाली. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरी स्टेजवर डान्स सादर करते आहे आणि युजरचा मित्र स्टेजच्या समोर ओला कंपनीची स्कूटर घेऊन उभा आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @saurav_rokade_ssr_official आणि @khushawart_tupe2717 यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून संपूर्ण घडलेला प्रकार कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून ओला सीईओ भाविश अग्रवाल यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) वरून शेअर केला आणि लिहिले की, चार बज गए लेकिन पार्टी अभी बाकी है! हा हा हा… ! ओला स्कूटर्स भारतातील सार्वजनिक उत्सवाचा एक भाग बनला आहे हे पाहून छान वाटत आहे ; असे खास कॅप्शन त्यांनी दिल आहे.