Viral Video: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका (Rashmika Mandanna) चा चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ची (Pushpa: The Rise) क्रेझ अजूनही लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा’च्या गाण्यांपासून ते डायलॉगपर्यंत आजही सोशल मीडियावर बोलबाला आहे. दरम्यान, ‘सामी-सामी’ (Sammi Sammi Song) गाण्याची हुक स्टेप सर्वांची आवडती डान्स स्टेप झाली आहे. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच या गाण्याचे व्हिडी ओ शेअर करत होते. दरम्यान, एका आजीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये त्या ‘सामी-सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील ‘सामी-सामी’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ‘सामी-सामी’ गाणे ऐकून आजीने डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी असा जबरदस्त डान्स केला, जो पाहून सगळेच थक्क झाले.

(हे ही वाचा: मेंदूला मार लागलेल्या ऊसतोड मजूराच्या मुलाचा रोहित पवारांनी वाचवला जीव)

(हे ही वाचा: PM Modi Europe Visit: ढोल-ताशे, लेझीम…पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जर्मनीत मराठमोळ्या पद्धतीने झालं स्वागत!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ‘gieddee’ या नावाच्या पेजने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर तीन हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. आजीच्या या जबरदस्त डान्सचे कौतुक करताना यूजर थकत नाहीत. या व्हिडीओवर युजर्स उत्साहाने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old age women dance on sami song video went viral on social media ttg