या जगात कोणाचे नशीब कधी आणि कुठे बदलेल हे काही सांगता येत नाही. कित्येक वेळा लोकांचे नशीब अशा प्रकारे बदलले की ते स्वतः त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. काही मुलांसोबतही असेच झाले, जेव्हा त्यांनी स्क्रॅपमधून एक जुनी एटीएम मशीन खरेदी केली. जेव्हा ती मशीन उघडली गेली, तेव्हा मुलांची लॉटरी निघाली आणि ते ‘लखपती’ झाले. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अहवालानुसार, मुलांनी एका माणसाकडून जुने एटीएम मशीन खरेदी केले होते, ज्याने मशीनची चावी दिली नाही. असे सांगितले जात आहे की मुलांनी ३०० डॉलर म्हणजेच सुमारे २२ हजार ३६० रुपये खर्च करून हे मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. चावी नसल्यामुळे मुलांनी हॅमर, ड्रिल आणि इतर उपकरणांच्या मदतीने ते मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर मुलं मशीन उघडण्यात यशस्वी झाली. मशीन उघडल्यावर त्याला दोन हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे दीड लाख रुपये रोख मिळाले. एवढी मोठी रक्कम पाहून मुलांच्या आनंदाला पारावार राहीला नाही.

अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ

OMG: ‘इथे’ सापडलं २७०० वर्षांहून अधिक जुनं लक्झरी शौचालय; जाणून घ्या त्याची खासियत

एका झटक्यात बदलले भाग्य

एटीएम मशीन विकत घेतलेल्या एका तरुणाने सांगितले की, आमी ही मशीन ज्यांच्याकडून खरेदी केली त्यांच्याकडे चावी न्हवती. त्याने आम्हाला सांगितले की त्यातून जे काही बाहेर येईल ते तुमचे असेल. म्हणून, आम्ही हे मशीन विकत घेतले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलांचे भाग्य कसे बदलले आणि एका क्षणात ते लखपती झाले. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर चर्चा करत आहेत.