Viral Video : नुकतीच भाऊबीज साजरी करण्यात आली. यानिमित्त्याने सोशल मीडियावर अनेक बहिण भावांचे सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे.चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सध्या अशाच एका वृद्ध बहिण भावाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओध्ये वृद्ध बहिण वृद्ध भावाला ओवाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि सलोखा असतो. सध्या असाच सलोखा जपणाऱ्या वृद्ध बहिण भावाचा व्हिडीओ पाहून तुम्ही भारावून जाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वृद्ध बहिण तिच्या भावाला ओवाळताना दिसत आहे. वृद्ध भाऊ सु्द्धा तिला ओवाळणी घालतो. नंतर दोघेही एकमेकांना गोड पदार्थ भरवतात. या वृद्ध बहिणीचे वय ८८ वर्षे तर वृद्ध भावाचे वय ८६ वर्षे आहे. उतार वयात बहिण भावाचे नाते जपणाऱ्या या भावंडांना पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बहिण भावाची आठवण येऊ शकते.

हेही वाचा : VIDEO : माय आळंदी बाप पंढरी! आळंदी येथील इंद्रायणी नदीत दिसून आले पांढऱ्याशुभ्र फेसाचे आच्छादन, केमिकलयुक्त पाण्यामुळे…

i.dazzling_soul या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही खरी भाऊबीज” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दोघांचही शतक पुर्ण होवोत हीच माउली चरणी प्रार्थना” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरे प्रेम आणि आपुलकी” आणखी एका युजरने लिहिलेय, “वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहणे ही खरी भाऊबीज”