सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपण अनेकदा पाहतो की, सोशल मीडियावर अचानक एखादे गाणे खूप चर्चेत येते आणि प्रत्येकजण त्याच गाण्यावर व्हिडिओ करताना दिसतो. सध्या असाच एक ट्रेंड चर्चेत आहे ज्यामध्ये लोक पाण्याची बाटली हातात घेऊन जोरात दाबतात आणि कारंज्यासारखे तुषार उडतात. ही भन्नाट ट्रिक वापरून अनेक लोक फोटो काढतात आणि व्हि़डीओ शूट करतात सध्या दिसत आहे. आता या ट्रेंडची भुरळ एका वयस्कर जोडप्यालाही पडली आहे. प्लास्टिक बाटली वापरून कारंजा करताना व्हि़डीओ शुट करण्याचा मोह या गोंडस आजी आजोबांनाही आवरला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियाच्या दिखाव्याच्या जगात दृष्ट लागावी इतकी गोंडस नाती क्वचितच पाहायला मिळतात. व्हायरल व्हिडीओमधील आजी आजोबांचे नातेही अगदी असेच आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे हे आजी-आजोबा प्लास्टिक बाटली वापरून कारंजा तयार करतात आणि छोट्याश्या कारंज्यामध्ये भिजण्याचा आनंद घेतात. आजोबांच्या हातात प्लास्टिकची बाटली आहे, जी ते हात उंचावून जोरात दाबतात ज्यामुळे बाटलीला पाडलेल्या छिद्रांमधून पाणी बाहेर उडते. जसे आजीच्या डोक्यावर पाणी पडते तसे तिच्या चेहऱ्यावर हसू येते. व्हिडिओ अत्यंत गोंडस आहे. व्हिडिओमध्ये आजी-आजोबांचे प्रेमळ नाते पाहायला मिळते आहे.

हेही वाचा – धावत्या ऑटोमागे स्केटिंगने केला स्टंट अन्…; तीन अल्पवयीन मुलांचा VIRAL VIDEO

हेही वाचा –पुण्यापासून फक्त २५ किमीवर आहे हे कलश मंदिर; तुम्ही पाहिले का? VIDEO होतोय व्हायरल

नेटकऱ्यांना आवडला व्हिडीओ

व्हिडीओ marathiasmitaofficialनावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “संपला विषय! बास अजून काय पाहिजे. या वयापर्यंत आयुष्य असं जगता आले पाहिजे.”

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनंकानी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “(आजी-आजोबांना) त्यांना आनंदी पाहून बरे वाटते”

दुसरा म्हणाला, “लय भारी, आजी आजोबा भारीच”

तिसरा म्हणाला की, “खूपच छान”

चौथा म्हणाला, “आयुष्य मजेत घालवायचं, जीवन एक कला आहे ज्याला जमली त्याने जीवनाचा आनंद घेतला आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old couple did water fountain with plastic bottle trend cute video goes viral snk