Old couple Viral video: ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये उतारवयात आजीचं आजोबांवरचं प्रेम पाहायला मिळतंय. यावेळी एका व्हिडीओतून आजी – आजोबांचे खरं प्रेम हे जगासमोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाळणं संपलं की उरतं फक्त सांभाळणं, तरुण्यात एकमेकांच्या सौंदर्यावर, स्टाईलवर, स्वभावावर भाळून एकमेकांच्या प्रेमात जोडपी पडतात मात्र नंतर उतारवयात एकमेकांना संभाळाव लागतं. ज्याला ते जमलं तोच जिंकला. या व्हिडिओमध्ये एक पत्नी आपल्या पतीला आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही प्रेम त्यांच्यावर प्रेम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप भावूक करत आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पती आपल्या आयुष्यातील शेवटचे काही क्षण जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. बायको त्याच्या जवळ बसून त्याला प्रेमाने मिठी मारते. ती त्याची पूर्ण काळजी घेत आहे. हा सुंदर व्हिडिओ @humshayar77 नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत युजरने कॅप्शन लिहिले आहे की, “काही वचने आयुष्यभर पाळली जातात…” ही पोस्ट आतापर्यंत ६ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. एका यूजरने लिहिले की, “आयुष्याला इथेही साथ हवी…” दुसऱ्या यूजरने लिहिले, “जर प्रेम खरे असेल तर एक व्यक्ती तुम्हाला मरेपर्यंत साथ देऊ शकते.” “खरा जीवनसाथी मिळणे खूप महत्वाचे आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old couple love till last moment of life emotional video goes viral srk