Viral Video : सोशल मीडियावर अनेक गोष्टी दरदिवशी व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण त्यांना आलेले अनुभव सुद्धा शेअर करतात. सध्या एका तरुणाने एका जोडप्याबरोबर संवाद साधला. या संवादामध्ये काका काकूंनी नातेसंबंधांविषयी खूप सुंदर भाष्य केले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काकांनी नाते टिकवायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काका काकू दिसेल. त्यांच्या हातात माइक आहे आणि ते एका तरुणाशी संवाद साधताना दिसत आहे.

काका – मी ज्या मुलीला पहिल्यांदा भेटणार तिलाच हो म्हणणार. मी माझ्या आईवडिलांना सांगितले होते की जी पहिली मुलगी दाखवणार, मी तिला मनाई करणार नाही.

काकू – हे जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आले तेव्हा चार पाच तास आम्ही बोलत होतो. अचानक त्यांनी मला विचारले तुम्हाला मी आवडले? मी म्हणाले काय तर ते पुन्हा विचारलं तुम्हाला मी आवडलो का तर ते खूप सुंदर होते खूप जास्त सुंदर होते तर खरं बोलायचं तर मी पाहूनच फ्लॅट झाले होते. माझा होकार होता. मनात विचार केला मला यांच्याशी लग्न करायचं

तरुण – एक जोडपं म्हणून तुमच्या नात्यात काय खास आहे?

काका – ती आहे. तिच्यामुळे शक्य आहे. माझ्यामुळे नाही. मी चुका करत असतो मी रोज चुका करते आणि ही मला समजावून सांगते की असं करायचं नसते

तरुण – हल्ली खूप लवकर नातं तुटते, त्यावेळी तुम्ही नात्याला कसं सांभाळून घेता?

काका – मी अशी व्यक्ती आहे, जिला नातं जपायला आवडते. मी कधी विचार केला नाही की तुटून जावे आणि तसा विचार सुद्धा मी केला नाही. जर थोडं काही झालं तर मी माफी मागतो. मला असं वाटतं की रिलेशनशिपमध्ये अहंकार खूप जास्त तेढ निर्माण करतो त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा.

हा संवाद ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. अनेकांना त्यांचे आईवडील किंवा लग्नानंतरचे दिवस आठवेन.

हेही वाचा : VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

shutterbonsai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर गोष्ट तुम्ही आज पाहाल”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अरेंज मॅरेजमधील जी सुंदरता आहे, त्याविषयी कोणी बोलत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “१९८० ची गोष्ट आहे, आता हे प्रेम अस्तित्वात नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला खरं प्रेम म्हणतात” एक युजर लिहितो, “प्रेम मिळावे तर असे नाहीतर सिंगलच ठीक आहोत” तर एका युजर लिहितो, “मी आशा करतो की आमचे सुद्धा भविष्य असेच असावे.

Story img Loader