Viral video: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर मिनिटाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा इतके मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात की हसून पोट दुखून येते. तुम्ही सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये वयोवृद्धांचा देखील समावेश असतो.अशाच एका आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आजीचे कौतुक केले आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आजी शेताच्या बांध्यावर उत्साहात डान्स करताना दिसत आहे. यावेळी आजीची स्टेप्स आणि एनर्जी दोन्हीही दिसत आहेत. आजीचा डान्स पाहून बाजूला असलेली महिलाही आजीसोबत नाचताना दिसत आहे. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजीच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे. पाऊस पडला म्हणून आजीला आनंद झाला अन् आजी शेतातच नाचायला लागली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य येईल.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.

पाहा व्हिडीओ

ajay_sakharkar_30 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही मात्र हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आमचा शेतकरी राजा खुश तर सगळा देश खुश, यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही.” या वयातदेखील आजीचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर हा डान्स अतिशय छान असल्याचे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.