Video : म्हातारपण हे कुणालाच चुकलेले नाही. प्रत्येकाच्या जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. शरीर थकलेले असते. त्यामुळे या वयात जितका आराम करावा तितके चांगले असते, असे म्हणतात. पण, सध्या सोशल मीडियावर आजी-आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, उतारवयातही प्रेम कसे जपले जाते? हा गोंडस व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, आजी-आजोबा एकमेकांना स्वयंपाकघरात मदत करीत आहे. आजी तव्यावर डोसा बनवताना दिसत आहे; तर आजोबा कांदा चिरताना दिसत आहेत. दोघेही त्यांच्या कामात मग्न आहेत. स्वयंपाकघरात एकमेकांना मदत करण्याची ही ओढ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
abishekchandamarakshan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्याा कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी आणि आजोबा आमच्यासाठी जेवण तयार करीत आहेत. खरे प्रेम यालाच म्हणतात. वय झाले तरीसुद्धा एकत्र काम करीत आहेत. त्यामुळे आयुष्य खरंच अधिक अर्थपूर्ण होतं.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझ्याकडे शब्द नाहीत. खरंच आजी आणि आजोबांना सलाम.” दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “यालाच खरंच प्रेम म्हणतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रेम हे असंच असतं; जे वयाबरोबर वाढत जातं.” अनेक युजर्सनी आजी-आजोबांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.