Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लग्न सोहळा असो वा कोणतेही शुभ कार्य उखाणा हा आवर्जून घेतला जातो. पूर्वी फक्त स्त्रिया उखाणा घ्यायच्या आता तितक्याच हौशीने पुरुष सुद्धा उखाणा घेताना दिसतात. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, यालाच उखाणा म्हणतात. सोशल मीडियावर असे अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही उखाण्याचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही उखाणे ऐकून पोट धरुन हसायला येते. सोशल मीडियावर अनेक नवनवीन प्रकारचे उखाणे व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई चक्क उखाणा घेत आहे. आजीबाईचा भन्नाट उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आजीबाईने उखाणा घेताना चक्क टोमॅटोचा उल्लेख केला आहे. एका वेगळ्या अंदाजात आजीने उखाणा घेतला आहे. सध्या या उखाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नऊवारी नेसलेली आणि कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेली एक आजीबाई उखाणा घेत आहे. आजीबाईचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क होईल. आजीबाई उखाणा घेताना म्हणते, “इंग्रज भाषेत टोमॅटोला म्हणतात टोटो, छत्रभूज पाटलांच्या हातामध्ये आहे इंदीराबाईचा फोटो” आजीचा हा उखाणा ऐकून काही लोकांना हसू आवरणार नाही. काही लोकांना हा उखाणा ऐकून त्यांच्या आजीची आठवण येईल.
prashis.shirsat.vision या इन्स्टग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजीबाईचा उखाणा..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजीचा आत्मविश्वास लेव्हल” तर एका युजरने विचारलेय, “कोणत्या डिक्शनरीमध्ये टोमॅटोला टोटो म्हणतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप भारी. खूप मस्त उखाणा घेतलाय.” अनेक युजर्सना हा उखाणा आवडलाय. काही यूजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सनी आजीने टोमॅटोला इंग्रजीत टोटो हा शब्द चुकीचा संबोधला, असे लिहिलेय.