Viral Video : सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात; तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ संतापजनक; तर काही व्हिडीओ अत्यंत भावनिक असतात. सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला वृद्ध पती-पत्नीच्या नात्यातील जिव्हाळा आणि प्रेम दिसून येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये वृद्ध पती-पत्नी रस्त्यानं जाताना दिसत आहेत. अचानक भररस्त्यात आजोबांच्या धोतराच्या निऱ्या सुटतात, तेव्हा रस्त्यावरच आजी आजोबांना धोतर नेसून देते. त्यानंतर दोघंही एकमेकांचा हात पकडून रस्त्यानं जाताना दिसतात.
या व्हिडीओवर “काय तुझी माया, सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा” हे सुंदर गाणं लावलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. उतारवयातील या जोडप्याचं प्रेम पाहून कोणीही थक्क होऊ शकतं.
हेही वाचा : पक्ष्यांनाही कळतं कचरा कुठे टाकावा; माणसांना कधी कळणार? व्हिडीओ एकदा पाहाच …
suraj.gavhane या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सना या व्हिडीओवर लावलेलं गीतही खूप आवडलं आहे.
एका युजरने लिहिलेय, “तो बघा चाललाय जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. खरं प्रेम करणारी शेवटची पिढी.” तर एका युजरने लिहिलेय, “अशी साथ असावी.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या वयात शेवटपर्यंत साथ देणारी जोडी आणि प्रेम.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मला माझे आजी-आजोबा आठवले.”