VIDEO : राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसनी दरदिवशी हजारो लोक प्रवास करतात. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावोगावी या बस जातात. एक दिवस जरी बस बंद असेल तरी गोंधळ उडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून नोकरी करणाऱ्यांपर्यंत सर्वच या बसनी नियमित प्रवास करतात. या बसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अनेकदा सणावाराला किंवा सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये या बसनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि भयंकर गर्दी पाहायला मिळते. काही मार्गावर बसची संख्या कमी आहे पण त्या तुलनेने प्रवाशांची संख्या जास्त आहे. अशा बसमध्ये दर दिवशी गर्दी दिसून येते. या गर्दीमध्ये प्रवास करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.या व्हिडीओत बसमधील गर्दी अनेकदा दिसून येते. काही व्हिडीओमध्ये बसमध्ये सीट पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुद्धा दिसून येते.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची भयानक गर्दी दिसून येईल पण एका आजीने अनोखा जुगाड करत गर्दीने भरलेल्या बसमध्ये बसायला जागा मिळवली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
हेही वाचा : VIDEO : भाकरी कशी बनवावी, हे आजीकडून शिका; भाकरी बनवताना आजीचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हायरल व्हिडीओ एका बस स्थानकावरील असावा. लोकं राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चढताना दिसत आहे. पण बस पूर्णपणे भरलेली आहे तरीसुद्धा लोक बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसते की एक आजी बसमध्ये जुगाड करुन बसलेल्या आहेत. त्या बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटच्या खाली जागा करुन बसल्या आहेत. बसच्या बाहेरुन त्या छोट्या खिडकीतून दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येईल. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.
dj_saidya_official55 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “नेमक्या आजी बसल्या तरी कुठे?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला आले आहेत.