लहानपणी गावी केले की आजी गरमा गरम भाकरी आणि मिरचीचा ठेचा खायला देत असे. ही आठवण जवळपास आपल्यापैकी प्रत्येकाच्या लहानपणीची आहे. मिरचीचा ठेचा आणि गरमा गरम भाकरी म्हणजे शेतकऱ्याचे जेवण. महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीमधील अत्यंत लोकप्रिय असा हा पदार्थ आहे. प्रत्येक घरामध्ये आवर्जून बनवला जाणारा आणि तितक्याच आवडीने तो खाल्ला जातो. पण जी चव गावाकडे चुलीवर बनवलेल्या ठेच्याला असते त्याची मज्जा दुसऱ्या कशामध्येच येत नाही.

तुम्हालाही झणझणीत मिरची ठेचा खायचा असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आजीबाईंचा व्हिडीओ एकदा नक्की पाहा, तुमच्याही बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. व्हायरल व्हिडीओमध्ये एका आजींनी चुलीवर मिरचीचा ठेचा कसा बनवायचा हे सांगितले आहे. लोकांना आजींचा हा व्हिडीओ प्रंचड आवडला आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच

Video : कोंबड्या चोरण्यासाठी लोकांची उडाली झुंबड! कोणी पोत्यात कोंबल्या तर कोणी हातात घेऊन पळाले

इंस्टाग्रामवर (kashiaajichi_recipe)काशीआजीची रेसीपी नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा पेजवर आजी गावकडच्या खाद्यपदार्थांच्या रेसिपी सांगतात आणि गावाकडच्या संस्कृतीची झलक दाखवतात. सध्या आजींनी चुलीवर बनवलेल्या मिरचीच्या ठेचाची रेसिपी सांगितली आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता, आजींची मिरच्यांचे देठ काढून घेतले. त्यानंतर चुलीवर तवा गरम करून त्यावर मिरच्या भाजण्यासाठी टाकल्या. मिरच्या चांगल्या भाजल्यानंतर त्यात थोडे तेल आणि मीठ टाकले आणि व्यवस्थि परतून घेतले. त्यानंतर आणखी थोडे तेल लसणाची पात टाकून मिरच्या परतून घेतल्या. चुलीवरील तवा जमिनीवर ठेवून एका तांब्याने मिरच्या चांगल्या ठेचून बारीक केल्या.

हेही वाचा – धक्कादायक! चालत्या SUV कारच्या छतावर झोपली होती दोन लहान मुलं; गोव्यातील पर्यटकाचा Video Viral

आजींनी व्हिडीओमध्ये असेही सांगितले की तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात तेल टाकावे. तयार ठेचा गरमा गरम भाकरीबरोबर खा. काशी आजींच्या झणझणीत मिरचीच्या ठेचा ही रेसिपी नेटकऱ्यांना फार आवडली आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या तर कोणाला आपल्या आजीची आठवण आली. व्हिडीओवर एकाने कमेंट केली की, आजींनी बालपणीची आठवण करून दिली. दुसऱ्याने लिहिले, माझी आजी अशीच मिरचीचा ठेचा बनवते तव्यावर…

Story img Loader