सोशल मीडिया हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती मोबाईलवर काही नाही काही व्हिडीओ पाहताना दिसतो. सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांचा विरुंगळा करण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया हे ठरलेले आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल आहे. विशेष गोष्ट म्हणजे या आजीही सोशल मीडिया इंन्फ्युएन्स आहेत ज्यांचे स्वत:चे युटुयूब चॅनेल आहे. आपल्या चॅनेलच्या प्रमोशनसाठी आजीबाईंनी भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. आपल्या चॅनेलचे प्रमोशन करणाऱ्या आजींचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलत्या काळाचा ट्रेंड लक्षात घेऊन अनेक लोक सोशल मीडियासाठी कॉन्टेंट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही नाही काही वेगळा कन्टेंट घेऊन येत आहे. सध्या व्हिडीओ कन्टेंटला लोकांची भरपूर पंसती मिळत आहे. युट्युब, टिक-टॉक, फेसबूक आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मिडिया माध्यमांचा वापर करून अनेकजण काही ना काही प्रकारचा व्हिडीओ तयार करत असतात. हे सहज उपलब्ध होणारे आणि कोणालाही सहज वापरता येईल असा पर्याय असल्यामुळे कोणीही त्याचा वापर करताना दिसत आहे. व्हिडीओ तयार करण्यासाठी कोणतेही निकष किंवा पात्रता लागत नाही. ज्याच्या हातात मोबाईल आहे तो काहीतरी व्हिडीओ शुट करतो आणि सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतो. यापैकी काही व्हिडीओ लोकांना आवडतात म्हणून चर्चेत येतात तर काही लोकांना आवडत नाही म्हणून त्यावर टिका केली जाते म्हणून चर्चेत येतात. दोन्ही स्थितीमध्ये व्हिडीओला प्रतिसाद मिळतो आणि व्हिडीओ व्हायरल होतो. सुरुवातीला यामध्ये काही उत्साही लोक नवनवीन व्हिडीओ पोस्ट करून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताना दिसले. पणा आता जवळपास सर्व वयोगटातील व्यक्ती व्हिडीओ तयार करताना दिसत आहे मग भलेही ते सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, लहान असो की मोठा असो, महिला असो की तरुण….सर्वजण सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ तयार करून पोस्ट करतात. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक खूप ट्रें

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, या आजी थार या कारच्या बोनेटवर बसलेल्या दिसत आहे. पुण्यातील एफसी रोडवरून ही कार फिरताना दिसत आहे. त्यांच्या युट्युब चॅनेलच्या प्रमोशनसाठी हा पब्लिसिटी स्ंटट केल्याचे लक्षात येते. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा – Ram Mandir : अयोध्येला न जाता कसा पाहू शकता श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा? घरबसल्या कसे घेऊ शकता प्रभु रामाचे दर्शन?

युट्युब चॅनेलच्या प्रमोशनसाठी भररस्त्यात वाहनांची ये-जा सुरू असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे दिसते आहे. इंस्टाग्रामवर morebalaji17 आणि sundarabai1948 नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पुण्यातील एफसी रोडवर रॉकिंग आजी”

हेही वाचा – Video : जम्मु काश्मीरच्या मुस्लीम तरुणीने पहाडी भाषेत गायले प्रभु रामाचे भजन; म्हणाली,”आम्हीही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात…”

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी आजींचे कौतूक केले, अभिनंदन केले तर काही लोकांनी आजीचा जीव धोक्यात टाकल्याबद्दल काळजी आणि रागही व्यक्त केला. काही लोकांनी आजीचा जीव धोक्यात टाकल्याबद्दल आणि भररस्त्यात असा स्टंट केल्याबद्दल पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old ledy setting on thar at fc road pune for publicity stunt for youtube changel promotion video goes viral snk