Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात तर कधी कोणी डान्स करताना दिसतात. कोणी जुगाड सांगताना दिसतात तर कधी कोणी नवनवीन गोष्टी शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी आजोबा गोड गाणं गाताना दिसतात. आजी आजोबांचं गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आजी आजोबा बसलेले दिसतात. या आजी आजोबांचे वय सत्तर- ऐंशीच्या जवळपास असावेत. हे आजी आजोबा सुंदर गाणं गाताना दिसत आहे. दोघेही तालासुरात गाणं गाताना दिसतात. “जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला” हे लोकप्रिय गाणं गाताना दिसतात. त्यांचं गाणं ऐकून तुमच्या अंगावरही काटा येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांचे आजी आजोबा आठवतील तर काही लोकांना भविष्यात त्यांच्यासारखं जगावसं वाटेल.

हेही वाचा : धबधब्यावरची मस्ती नडली; तीन मित्र एक दगड अन् पाण्याचा प्रचंड वेग; रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून झोप उडेल

पाहा व्हायरल व्हिडीओ

behkanaa2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “
या काका काकूने आमचा दर्जा उंचावला आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. असं म्हणतात, प्रेम व्यक्त करायला वयाचं बंधन नसतं. तुम्ही कोणत्याही वयात प्रेम व्यक्त करू शकता. या व्हायरल व्हिडीओमध्ये आजी आजोबा इतक्या सुंदरपणे आणि मनापासून गाणं गाताना दिसत आहे की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : Video: धावत्या ट्रेनमध्ये जोडप्यांसह तरुणाचा तुफान राडा पाहून नेटकरी म्हणाले, “रेल्वेतील सीटची समस्या ही…”

एका युजरने लिहिलेय, “फक्त येथेपर्यंत येऊन सोबत गाणं गायचं आहे.बाकी काही नाही” तर एका युजरने लिहिलेय, “इंटरनेटवरील हा सर्वात सुंदर व्हिडीओ आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आले” एक युजर लिहितो, “किती मनापासून गात आहे.” एक युजर लिहितो, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. या पूर्वी असेच अनेक वृद्ध जोडप्यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. एका जोडप्याने सुंदर डान्स केलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.