Viral Video : सध्या देशभरात नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. ठिकठिकाणी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रीमध्ये गरबा व दांडिया महोत्सव आवडीने साजरा केला जातो. लोक अतिशय उत्साहाने गरबा व दांडिया खेळतात.
सध्या सोशल मीडियावर अनेक लोकांचे दांडिया किंवा गरबा खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये एक आजी आजोबा दांडिया खेळताना दिसत आहे. त्यांच्या दांडिया डान्स पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल. (old man and woman dance on dandiya in Navratri old couple dandiya dance video viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दांडिया महोत्सव आयोजित केलेला दिसेल. काही तरुण मुले दांडिया खेळताना दिसत आहे पण सर्वांचे लक्ष एका आजी आजोबांनी वेधून घेतले आहे. आजी आजोबा अतिशय उत्साहाने दांडिया खेळताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही भारावून जाल. त्यांची ऊर्जा पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. या आजी आजोबांचे वय सत्तरीच्या आसपास असावेत पण तरुणांना लाजवेल इतके सुंदर ते डान्स करताहेत. त्यांनी दांडिया ड्रेस घातला आहे. त्या लूकमध्ये हे आजी आजोबा अतिशय सुंदर दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
theghotalaguy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवरात्री हा गुजरातींसाठी फक्त एक सण नसून ती एक भावना आहे! या पवित्र सोनेरी क्षणांना तुम्ही हरवू शकत नाही.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम, या वृद्ध जोडप्यांना माझे खूप खूप प्रेम” तर एका युजरने लिहिलेय, “आज इंटरनेटवर बघितलेला सर्वात सुंदर व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “पन्नास वर्षानंतर मी आणि माझा नवरा ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.