Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही रडवणारे. तर काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पाडणारे असतात असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता प्रत्येकालाच शहराचा झगमगाट, चंदेरी दुनिया हवीहवीशी वाटू लागली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता लोक गावाकडून शहरात स्थायि झाले. त्यामुळे पहिल्यासारखं आता कुणी गावी राहिलंच नाही. असच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, यामधून गावाकडे आता फक्त आजी-आजोबाच राहतात का? असा प्रश्न पडतो.

गावी मुलं शिक्षणासाठी शहराकडे जातात, नोकरीसाठी शहराकडे जातात, अशावेळी दूरदेशी गेलेल्या पाखरांची वाट पाहणारे हे गावोगावचे उदास उंबरठे दरसालचे अपरिहार्य ऋतू हतबल वेदनांनी पुढेपुढे सरकवत राहतात, कधीतरी पाखरं पुन्हा फिरतील घरट्याकडे, या खात्रीशून्य आशेने! अशाच एका आजोबांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. पूर्वी गाव कसं भरलेलं असायचं, आता गावी म्हाताऱ्या माणसांशिवाय कोणी दिसत नाही. ‘हा’ हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून शहरात राहणाऱ्या मुलांचे डोळे नक्की पाणावतील.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “सगळ्या गावात फक्त म्हातारी माणस चाकरमान्यांची वाट बघत राहिलीत, सर्वच गावात आता हिच परिस्थिती आपल्याला दिसते. गावी आता सगळीकडे खाली खालीच असतं, पहिले दिवसच वेगळे होते.” असं लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Gautami Patil: पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गणपतीत चाकरमानी गावाकडे ८ दिवस जातात तेव्हा कुठे गाव भरलेलं वाटतं. मात्र पुन्हा गाव ओसाड वाटू लागतं. या व्हिडीओवर नेटकरी भावूक कमेंट करत आहेत. असे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात.

Story img Loader