Viral video: असं म्हणतात वय हा फक्त एक आकडा जर आपल्यात तरुणपणातलाच तोच उत्साह किंवा जिद्द असेल तर तर वयाकडे कधीच लक्ष जात नाही. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवनाचं कौतुक वाटतं. शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खासगीत करत असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असेही असतात जे प्रत्येक क्षणात आनंद शोधत असतात. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल कलेला वय नसतं.

समाजात प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. नोकरी, लग्न, मुलं, कामाचं वय आणि ही सगळी कामं पूर्ण करून थकल्यावर निवृती. मात्र समाजात काही असेही लोक आहेत ज्यांना आराम हा माहितच नसतो. ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी मेहनत करायला तयार असतात. ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. अशाच एका आजोबांची गोष्ट आज आम्ही तु्म्हाला सांगणार आहोत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजोबा या वयातही फोटोग्राफी करत आहेत. एका समारंभात हे आजोबा प्रोफेशनल पद्धतीने फोटो काढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानही तुम्ही पाहू शकता.

कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल

उपजीविकेसाठी शिक्षण जरूर घ्या; पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील; पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल, असा मौलिक सल्ला पु. ल. देशपांडे देऊन गेले. प्रत्येकानं आयुष्यात एखाद्या तरी कलेशी मैत्री जरूर करावी. खरं तर कला आयुष्याला समृद्ध करते. कला आयुष्यात रंग भरते. कला ही विविध गोष्टींतून आपल्याला दिसून येत असते.अशीच कला हे आजोबा शेवटपर्यंत जपताना दिसत आहेत. कला आणि छंद आपल्याला रोजच्या धावपळीत काही आनंदाचे क्षण देऊन जातात. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी” पक्षाचा हा व्हिडीओ पाहून कळेल…”पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे…”

हा व्हिडीओ adersh_ekanath नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, यावर नेटकरी वेगेवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला अवगत असलेल्या वेगवेगळ्या कलांचा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वापर करू शकता आणि तुमच्या करिअरला कलाटणी देऊ शकता.