सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ. कोणता व्हिडिओ नेटिझन्स डोक्यावर घेतील सांगता येत नाही. या ना त्या कारणाने रोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो.काही व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. तर काही व्हिडिओ पाहून नेटकरी खूश होतात. सध्या सोशल मीडियावर कोणत्याही गाण्यावर डान्स करत छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण या व्यासपीठाद्वारे त्यांची प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचवण्यात गुंतलेला आहे. काहीवेळा व्हिडिओ इतके मजेदार बनतात की पाहणाऱ्यांना हसू आवरता येत नाही. या प्लॅटफॉर्मवर कौशल्य दाखवण्याची भरपूर संधी आहे. दुसरीकडे, नकळत काही व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर टाकताच व्हायरल होतात आणि त्यावर लाखो-करोडो व्ह्यूज येतात. असाच एक व्हिडिओ गेल्या काही दिवसात नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
बॉलिवूड चित्रपटातील ‘सात समंदर पार’ या गाण्यावर एक आजोबा थिरकताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स प्रत्येक जण आवाक झाला आहे. या वयात इतका जोश पाहून नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. हा व्हिडिओ ‘sunnythakur7919’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
आजोबांचा दिलखुलास डान्स पाहून नेटकरी खूश झाले आहेत. बघता बघता हजारो व्ह्यूज आणि हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरील मजेशीर कमेंट्स करण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.