Cricket Viral video: क्रिकेट हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतात धर्मवेड्यांप्रमाणेच क्रिकेटवेड्या लोकांचा एक वेगळा गट आहे. अनेक तरुणांचं क्रिकेट हे पहिलं प्रेम असतं. अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्याही हातात हल्ली बॅट दिली जाते. जन्मत:च त्यांना क्रिकेट खेळायची आवड निर्माण होते आणि नंतर ते कितीही मोठे झाले तरी क्रिकेट काही सुटत नाही. अशाच एका क्रिकेटवेड्या आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वयातही त्यांची खेळी बघून तुम्ही अवाक् व्हाल एवढं नक्की; तर आजोबांनी मारलेला सिक्सर पाहून तुमचीही झोप उडेल.

माणसाचा उत्साह त्याच्या वयानुसार कमी होऊ लागतो; मात्र या गोष्टीला चुकीचे ठरविणारा एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्साहाला वय वा अन्य कशाचेच बंधन नसते. याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा जबरदस्त क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यांना पाहून त्यांचे वय ६० च्या वर असल्याचा अंदाज येतो. मात्र, त्यांचा उत्साह तरुणांना लाजविण्यासारखा आहे. त्यांची जबरदस्त अशी बॅटिंग पाहून त्यांच्यासमोर धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही फिका पडल्यासारखा वाटत आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेतील आहे. आजोबा एकामागून एक षटकार मारतात. ते ज्या ताकदीने बॅटिंग करीत आहेत, ते पाहून बॉलरदेखील अवाक् झाल्याचे दिसून येत आहे.

आजोबांच्या बॅटिंगचे जोरदार कौतुक

हा व्हिडीओ पाहून अनेक जण थक्क झाले आहेत आणि ते आजोबांच्या या बॅटिंगचे जोरदार कौतुक करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेत पुढे गेलेली ही वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही अशी उत्साही दिसली की, बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आयुष्य एवढं सहज मिळतं का?” रीलसाठी तरुणानं धावत्या बाईकवर काय केलं पाहा; VIDEO पाहून संतापले लोक

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे; ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ official_up_tennis_cricket नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाइक्स आणि शेअर मिळत आहेत. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. एकानं म्हटलंय “काकांना तारुण्यातही क्रिकेटचे वेड असेल.” तर आणखी एकानं “वय कितीही झालं तरी बाप हा बाप असतो” असं म्हटलं आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या खेळीचं कौतुक केलं आहे.